07 January 2026

मकर संक्रांती २०२६, अध्यात्मिक महत्व, विविध परंपरा आणि तिळाचे महत्व

Start Chat

मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीत अत्यंत शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी सूर्यदेव दक्षिणायन सोडून उत्तरायणाची यात्रा सुरू करून मकर राशी मध्ये प्रवेश करतात. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ दानधर्म, प्रार्थना आणि नव्या शुभ आरंभासाठी अत्यंत मंगल मानला जातो. ह्याला उत्तरायण असे हि संबोधले जाते  ज्यामध्ये दिवस हळूहळू मोठे आणि रात्र लहान होऊ लागतात,जो अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतोच पण ते सकारात्मकता आणि ऊर्जेचे प्रतीक सुद्धा सूचित करते. मकर संक्रांत हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण मानला जातो कारण या काळात रब्बी पिकांची कापणी सुरू होते आणि शेतकरी आपल्या कष्टाचे फळ पाहतात. नवीन धान्य घरात येते आणि त्याचा आनंद साजरा केला जातो. हा सण निसर्गाशी असलेले आपले नाते हि अधोरेखित करतो.

 

धार्मिक व अध्यात्मिक महत्व आणि पौराणिक कथा 

प्राचीन हिंदू धर्मग्रंथांनुसार, सूर्याच्या प्रवासावर आधारित संपूर्ण ब्रह्मांड दोन भागांत विभागलेले आहे. जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करून आपली सहा महिन्यांची उत्तरायणाची यात्रा सुरू करतात, तेव्हा हा काळ देवमार्ग मानला जातो आणि अध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत शुभ समजला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. प्रयागराज, हरिद्वार आणि वाराणसी यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांमध्ये या दिवशी लाखो श्रद्धाळू स्नानासाठी एकत्र जमतात. 

 

आध्यात्मिक महत्त्व :

  • उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस 
  • दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र
  • उत्तरायण काळात देहत्याग करणाऱ्या आत्म्यांना मोक्षप्राप्ती सुलभ होते, अशी श्रद्धा आहे. 
  • हा काळ ध्यान, योग व विविध आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत योग्य मानला जातो. 

 

असे म्हटले जाते महान कुरुक्षेत्र युद्धात प्राणघातक जखमा झाल्यानंतरही भीष्म पितामहांनी दक्षिणायन काळात देहत्याग करण्यास नकार दिला. उत्तरायणात देहत्याग केल्यास आत्म्याला थेट स्वर्गलोकाकडे जाण्याचा मार्ग मिळतो आणि अंतिम मोक्षप्राप्ती होते, हे त्यांना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी उत्तरायण येईपर्यंत इच्छामृत्यूचे वरदान वापरून प्राण धारण केले.

मकर संक्रांतीशी संबंधित आणखी एक सुंदर पौराणिक कथा पवित्र गंगा नदीशी निगडित आहे. मानवजातीचे पावित्र्य जपले जावे आणि त्याचे शुद्धीकरण व्हावे ह्यासाठी राजा भगीरथाने देवी गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्यासाठी घोर तपश्चर्या केली. त्यावर प्रसन्न होऊन देवी गंगा धरतीवर येण्यास तयार झाली. पण तिच्या प्रचंड वेगामुळे पृथ्वीचा नाश होऊ नये म्हणून भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण केले. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा अखेर पृथ्वीवर अवतरली आणि बंगालमधील गंगासागर येथे समुद्राला मिळाली. म्हणूनच या दिवशी गंगा नदीत स्नान करणे, दान-धर्म करणे आणि पुण्यकर्मे करणे विशेष फलदायी मानले जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी केलेले पुण्य कैकपटीने वाढते. 


मकर संक्रांती दिनांक व शुभ काळ

 

मकर संक्रांती ह्या वर्षी बुधवारी, १४ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. मकर संक्रांतीचा शुभकाळ २ तास ३२ मिनिटांचा असून तो दुपारी ३:१३ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ५:४५ वाजेपर्यंत असेल. ह्या काळामध्ये सर्व विधी तसेच दान-धर्म केल्यास त्याचे भरघोस पुण्य मिळेल.  

 

मकर संक्रांती २०२६ : पूजा विधी व धार्मिक विधी

मकर संक्रांती हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करतात. कलशातील पाणी सूर्यदेवाला अर्पण करतात. त्यासोबत तीळ, लाल फुले व तांदूळ अर्पण केले जातात. सूर्यदेवाच्या मूर्तीवर किंवा चित्रावर चंदनाचा टिळा लावला जातो. तांदळाचे पीठ व कुंकू यांचे मिश्रणही अर्पण केले जाते. अनेक भक्त सूर्यदेवाला लाल किंवा पिवळ्या रंगाची नवीन वस्त्रे अर्पण करतात. खिचडीचा नैवेद्य अर्पण करण्याचीही परंपरा आहे.


मकर संक्रांतीचे काही विशेष मंत्र 

सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तसेच  सकारात्मक ऊर्जा, उत्तम आरोग्य, यश व आत्मविश्वासासाठी

“ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः”

“ॐ सूर्याय आदित्याय नमः”

“ॐ हं सूर्याय नमः”

या सूर्य बीज मंत्रांचा विशेषकरून जप केला जातो.

 

देशाच्या विविध भागांत मकर संक्रांती वेगवेगळ्या परंपरा, रितीरिवाज आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जाते.

 

महाराष्ट्र – मकर संक्रांती

ह्या दिवशी विवाहित स्रिया हळदी-कुंकू आयोजित करतात आणि येणाऱ्या स्रियांना तिळगुळ आणि भेटवस्तू देतात 

‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे बोलत लोक एकमेंकाना शुभेच्छा देतात ह्यातून नात्यांमधील कटुता दूर होऊन त्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा हा उद्देश. 

ह्या दिवशी गुळपोळी, तीळ आणि गुळामध्ये बनवलेले लाडू तसेच इतर मिष्टान्न वाटले जातात 

 

गुजरात – उत्तरायण

घरांच्या छतांवर उत्साहपूर्ण वातावरणात पतंग उडविले जातात आणि ‘काय पोछे’ चा जल्लोष सर्वत्र असतो 

उंधियू, जिलेबी, चिक्की यांसारखे पारंपरिक पदार्थ एकमेकांना वाटले जातात 

उत्तरायण हा आनंद, एकतेचा आणि नवचैतन्याचा सण मानला जातो.

 

पंजाब व हरियाणा – लोहडी

संक्रांतीच्या आदल्या दिवशी लोहडी साजरी करतात 

शेकोटी पेटवून त्यात शेंगदाणे, रेवडी, मक्याचे दाणे हे टाकले जाते 

शेकोटीच्या भवती पारंपरिक भांगडा व गिद्धा नृत्य केले जाते 

नवविवाहित व नवजात बालकांसाठी हा विशेष उत्सव असतो

 

तामिळनाडू – पोंगल

शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा गौरव व पशुधनाचा सन्मान करण्यासाठी हा सण साजरा केला जातो 

भोगी, थाई पोंगल, मट्टू पोंगल, कानूम पोंगल असा चार दिवसांचा हा सण असतो 

नव्या भातापासून गोड पोंगल पदार्थ शिजवला जातो

उघड्या अंगणात भात उकळताना “पोंगलो पोंगल” असा जयघोष केला जातो 

घरासमोर सुंदर कोलम रांगोळ्या घालतात

 

मकर संक्रांतीत तीळाचे महत्त्व

मकर संक्रांतीमध्ये  तिळाला विशेष महत्त्व आहे. हा सण हिवाळ्याच्या मध्यावर येत असल्याने तीळाचे सेवन आरोग्य, अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या उपयुक्त मानले जाते.

 

दानाचे महत्त्व: तिळाचे दान पापक्षय व पुण्यप्राप्तीसाठी श्रेष्ठ मानले जाते.

सलोख्याचा संदेश: ‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ ह्या वाक्यातून सामाजिक सलोखा व सकारात्मक संवाद निर्माण होतो. 

म्हणूनच मकर संक्रांतीला तीळगूळ, तिळाचे लाडू, तिळाची चिक्की  व इतर पदार्थ करून आरोग्य, सद्भावना आणि समृद्धीची कामना केली जाते.

 

निष्कर्ष 

उत्तरायणाच्या प्रारंभी साजरा होणारा मकर संक्रांती हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे, कटुतेतून सलोख्याकडे तसेच निसर्गाशी एकोपा जपण्याचा संदेश देतो.  या दिवशी गंगा नदीत स्नान करणे, सूर्यदेवाची पूजा करणे दान-धर्म करणे आणि पुण्यकर्मे करणे विशेष फलदायी मानले जाते. 

 

आज समाजात अनेक लोकांना पायाने चालता येत नाही, ह्या दिव्यांगांना त्यांच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर बनवण्याचा चंग नारायण सेवा संस्थानाने बांधला आहे. नुसते ठरविले नाही तर मागील ४० वर्षांत जवळजवळ ४ लाख दिव्यांगांवर योग्य शस्रक्रिया करून ते करून दाखविले आहे. नारायण सेवा संस्थानाच्या सेवा यज्ञात अनेक परोपकारी लोकांची साथ लाभली. एका छोट्या दानातून आपण एका दिव्यांग व्यक्तीला त्याच्या पायावर उभे करू शकता आणि त्यातून मिळणारे शुभाशीर्वाद अनमोल तर आहेतच  पण मनाला समाधान देणारे असतात. नारायण सेवा संस्थानाच्या सेवाकार्यात आपणही सहभागी होऊ शकता.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्रश्न: मकर संक्रांत २०२६ रोजी कधी आहे?
उत्तर: मकर संक्रांत हा सण २०२६ साली १४ जानेवारी २०२६ (बुधवार) रोजी साजरा केला जाईल. मकर संक्रांतीचा शुभकाळ दुपारी ३:१३ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ५:४५ वाजेपर्यंत असेल.

प्रश्न: मकर संक्रांतीचे शास्त्रीय, वैद्यकीय आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे?
उत्तर: मकर संक्रांतीला सूर्याचा उत्तर दिशेकडे होणारा प्रवास म्हणजेच उत्तरायण सुरू होतो. या काळात दिवस मोठे व रात्री लहान होतात. शास्त्रीयदृष्ट्या हा ऋतुबदलाचा काळ असून वैद्यकीयदृष्ट्या शरीरात ऊर्जा वाढविण्यास उपयुक्त मानला जातो. आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ सकारात्मकता, ऊर्जा आणि मोक्षप्राप्तीस अनुकूल मानला जातो.

प्रश्न: मकर संक्रांतीला तिळगूळ का दिला जातो?
उत्तर: हिवाळ्यात शरीराला उब आणि ऊर्जा देण्यासाठी तीळ व गूळ उपयुक्त असतात. तसेच “तिळगूळ घ्या, गोड बोला” या परंपरेतून सामाजिक सलोखा, मधुर संवाद आणि शत्रुत्व दूर करण्याचा संदेश दिला जातो.

प्रश्न: मकर संक्रांतीला कोणते धार्मिक विधी करणे शुभ मानले जाते?
उत्तर: या दिवशी सूर्यपूजन, पवित्र नदीत (गंगा नदी) स्नान, दान-धर्म, जप-तप आणि विविध पुण्यकर्मे करणे अत्यंत शुभ मानले जाते.

प्रश्न: मकर संक्रांतीला दान का करावे?
उत्तर: मकर संक्रांत म्हणजे उत्तरायण, ज्याला देवांचा दिवस मानले जाते. त्यामुळे या दिवशी केलेल्या दानाने पापक्षय होतो आणि पुण्यवृद्धी होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

प्रश्न: मकर संक्रांतीला कोणते दान फलदायी ठरते?
उत्तर: या दिवशी तांदूळ, उडीद डाळ, तीळ, गूळ तसेच थंडीपासून संरक्षण देणारे सुती कपडे दान करणे विशेष फलदायी मानले जाते.

X
Amount = INR