• Home
  • कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी
Corporate Social Responsibility

CSR च्या माध्यमातून बदला एखाद्याचं आयुष्य

तुमची एक छोटीशी मदत दिव्यांग आणि गरजू लोकांसाठी नवीन आशा, स्वावलंबन आणि सन्मानाचा पाया बनू शकते.

आमच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) पार्टनरशिपमध्ये आपले स्वागत आहे

नारायण सेवा संस्थानमध्ये आपले स्वागत आहे. १९८५ पासून नारायण सेवा संस्थान दिव्यांग, गरीब, हतबल आणि गरजू लोकांचे आयुष्य सुधारण्यासाठी सतत काम करत आहे. दिव्यांगांवर मोफत शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव आणि कॅलिपर्सचे वाटप, कौशल्य विकास प्रशिक्षण, शिक्षण, सामूहिक विवाह आणि इतर अनेक कल्याणकारी उपक्रमांद्वारे संस्थेने हजारो कुटुंबांच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणि आत्मविश्वास आणला आहे.

संस्थान तुम्हाला या पवित्र सेवेचा एक भाग होण्यासाठी आमंत्रित करत आहे. तुमच्या CSR मदतीच्या जोरावर आम्ही जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत वैद्यकीय उपचार, पुनर्वसन, शिक्षण आणि स्वावलंबनाचे नवीन मार्ग पोहोचवू शकतो. चला, एकत्र येऊन असा समाज घडवूया जिथे केवळ साधनांच्या अभावामुळे कोणीही आपल्या स्वप्नांपासून वंचित राहणार नाही.

CSR

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) म्हणजे काय?

  • CSR हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे कंपन्या आपला व्यवसाय सांभाळून समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात.
  • CSR अंतर्गत कंपन्या दिव्यांगांचे सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य सेवा, पर्यावरण रक्षण आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देऊन समाजात एक चांगला बदल घडवून आणतात.
  • भारतात, कंपनी कायदा २०१३ नुसार, ठरवून दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या कंपन्यांना CSR उपक्रम राबवणे अनिवार्य आहे.

Become a Partner →

आमचे मुख्य CSR कार्यक्षेत्र

संस्थान समाजात दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने CSR कार्यक्रम राबवते.

  • आरोग्य सेवा: दिव्यांगांना मोफत शस्त्रक्रिया आणि कृत्रिम अवयव उपलब्ध करून देणे, जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, स्वावलंबी बनतील आणि उत्तम आयुष्य जगू शकतील. (SDG 3 : चांगले आरोग्य आणि सुदृढ जीवन)
  • शिक्षण : प्रात्यक्षिक व कौशल्यपूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिव्यांग आणि गरजू लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे. (SDG 4 : दर्जेदार शिक्षण)
  • कौशल्य विकास: दिव्यांग आणि गरजू घटकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, जेणेकरून ते सन्मानाने आपले जीवन जगू शकतील. (SDG 8 : सन्मानजनक काम आणि आर्थिक वाढ)
  • सामाजिक समावेश: जनजागृती मोहिमा, सुलभ सुविधा आणि समाजातील सहभागाद्वारे दिव्यांगांना मुख्य प्रवाहात जोडणे आणि सर्वांना समान संधी निर्माण करून देणे. (SDG 10 : विषमता कमी करणे)
Join Hand With Us →
CSR

आमच्या CSR उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे फायदे

नारायण सेवा संस्थानसोबत भागीदारी केल्याने तुमच्या ब्रँडला CSR उद्दिष्टे पूर्ण करण्यासोबतच समाजावर सकारात्मक आणि मोजता येण्याजोगा प्रभाव निर्माण करता येतो.

चांगली ब्रँड ओळख

चांगली ब्रँड ओळख

CSR मुळे लोकप्रियता वाढते, विशेषतः जेव्हा ते पवित्र आयोजनांशी जोडले जाते.

कर्मचारी सहभाग

कर्मचारी सहभाग

वर्षभरातील विशेष प्रसंगी सेवा कार्यांमध्ये कर्मचाऱ्यांना सहभागी करून घ्या.

मूल्यांकन प्रीमियम

मूल्यांकन प्रीमियम

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या एका अभ्यासानुसार, मजबूत CSR मुळे मूल्यांकनात 11% वाढ होते.

समुदायावर परिणाम

समुदायावर परिणाम

आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण दिवसांमध्ये दिव्यांगांना देणगीद्वारे मदत करा.

शाश्वत बदल

शाश्वत बदल

लोकांचे जीवन सुधारतील आणि त्यांचे भविष्य घडवतील अशा प्रकल्पांद्वारे दीर्घकाळ टिकणारे बदल घडवून आणा.

Become a Change Partner

CSR साठी नारायण सेवा संस्थानची निवड का करावी?

तुमची CSR उद्दिष्टे प्रभावीपणे, पारदर्शक पद्धतीने आणि प्रत्यक्ष परिणाम दिसेल अशा पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आमच्या अनुभवावर आणि सेवाभावावर विश्वास ठेवा.

सेवाकार्याची विश्वासार्ह परंपरा
१९८५ पासून आम्ही दिव्यांगांसाठी ४,५१,०५७ पेक्षा जास्त मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि लाखो लोकांच्या आयुष्यात नवीन आशेचा किरण आणला आहे.
भारतीय संस्कृती आणि सेवेचा संगम
धार्मिक आणि सामाजिक प्रसंगांच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विशेष सेवाउपक्रमांद्वारे आम्ही समाजाशी असलेले आपले नाते अधिक मजबूत ठेवतो आणि गरजूंपर्यंत अर्थपूर्ण समाजसेवा पोहोचवतो.
नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे पुनर्वसन
१,००,००० हून अधिक दिव्यांग व्यक्तींना आम्ही कृत्रिम अवयव उपलब्ध करून दिले आहेत. त्यांना पुन्हा स्वावलंबी होता यावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत.
समाजाच्या गरजांवर आधारित सक्षमीकरण
दुर्गम भागात राहणाऱ्या दिव्यांग आणि गरजू लोकांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्या विकासासाठी व पुनर्वसनासाठी काम करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.
तुमच्या CSR उद्दिष्टांनुसार ठरवलेले कार्यक्रम
तुमच्या कंपनीच्या CSR प्राधान्यांनुसार जसे की, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास आणि समाजकल्याण विशेष उपक्रम तयार केले जातात.
राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली संस्था
दिव्यांगांची सेवा, सामाजिक बांधिलकी आणि समाज विकासातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नारायण सेवा संस्थानला अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हे पुरस्कार आमच्या कामाची पारदर्शकता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत.

आमचे CSR पार्टनर्स काय म्हणतात

नारायण सेवा संस्थानसोबत काम करून समाजात सकारात्मक आणि दीर्घकाळ टिकणारा बदल घडवून आणण्यासाठी आमचे पार्टनर्स कशा प्रकारे योगदान देत आहेत, ते जाणून घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबलिटी अर्थात कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी. याचा अर्थ कंपनीने नैतिक पद्धतीने व्यवसाय करताना समाजासाठीही सकारात्मक योगदान देण्याची जबाबदारी स्वीकारणे. यामध्ये समाज, पर्यावरण आणि विविध घटकांच्या हितासाठी आर्थिक नफ्यापलीकडे जाऊन विविध उपक्रम राबवले जातात.

शिक्षणाच्या कार्यक्रमांना मदत करणे, पर्यावरण संवर्धनासाठी काम करणे, आरोग्यविषयक उपक्रमांना मदत करणे, विविधता आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणे तसेच वंचित समाजातील लोकांना मदत करणे ही CSR ची काही उदाहरणे आहेत.

CSR अंतर्गत अनेक प्रकारचे उपक्रम राबवता येतात. यामध्ये सामाजिक मदत, कर्मचाऱ्यांचा स्वयंसेवी सहभाग, पर्यावरणाचे संरक्षण, नैतिक पद्धतीने व्यवसाय करणे आणि समाजाच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबवणे यांचा समावेश होतो.

होय. सामाजिक कल्याण, नैतिक पद्धतीने काम करणे आणि शाश्वत विकासासाठीच्या उपक्रमांबाबत आमची स्पष्ट आणि मजबूत CSR पॉलिसी आहे. ही पॉलिसी आमच्या उद्दिष्टांशी आणि मूल्यांशी सुसंगत आहे.

CSR निधीचा वापर आमच्या विविध कार्यक्रमांसाठी आणि सेवा उपक्रमांसाठी पारदर्शक पद्धतीने केला जातो. निधीचा जास्तीत जास्त आणि योग्य परिणाम साधता यावा यासाठी सविस्तर अहवाल आणि ऑडिटच्या माध्यमातून पारदर्शकता आणि जबाबदारी राखली जाते.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीमुळे समाज आणि पर्यावरणाला फायदा होतो. त्याचबरोबर कंपनीची विश्वासार्हता वाढते, कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि सहभाग वाढतो आणि व्यवसायाच्या दीर्घकालीन विकासालाही मदत होते.

CSR आणि शाश्वत विकास यांचा जवळचा संबंध आहे. CSR अंतर्गत राबवले जाणारे उपक्रम पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित गरजांवर काम करतात. त्यामुळे शाश्वत विकास आणि जबाबदार व्यवसाय पद्धतींना प्रोत्साहन मिळते.

CSR मुळे कंपनीची प्रतिमा आणि विश्वासार्हता सुधारते, ग्राहकांचा विश्वास वाढतो, कर्मचाऱ्यांचे समाधान आणि कंपनीत टिकून राहण्याची भावना वाढते, विविध घटकांशी चांगले संबंध निर्माण होतात. तसेच कामकाज अधिक कार्यक्षम झाल्यामुळे काही खर्चातही बचत होऊ शकते.

व्यवसायासाठी CSR गरजेचे आहे कारण यामुळे लोकांचा विश्वास जिंकता येतो, धोके कमी होतात, नवीन गुंतवणूकदार आकर्षित होतात आणि व्यवसायाची दीर्घकालीन वाढ होते.

होय. अर्थपूर्ण सामाजिक बदल घडवून आणणे, शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे आणि आमच्या संस्थेच्या मूल्ये व उद्दिष्टांशी आमचे उपक्रम जोडून ठेवणे यासाठी आमच्याकडे सर्वसमावेशक CSR रणनिती आहे.

CSRच्या मदतीमुळे नारायण सेवा संस्थानला अधिक लोकांपर्यंत पोहोचता येते, समाजाशी असलेले संबंध अधिक मजबूत करता येतात आणि नवीन भागीदारी व संसाधने मिळवता येतात. यामुळे दिव्यांग आणि गरजू व्यक्तींची सेवा करण्याचे आमचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येते.

कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणजे व्यवसाय करताना त्याचा समाज आणि पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन जबाबदारीने काम करणे. यामध्ये नैतिक पद्धतीने व्यवसाय करणे, समाजासाठी उपक्रम राबवणे आणि पर्यावरणाची काळजी घेणे यांचा समावेश होतो.

 

दिव्यांग आणि गरजू लोकांची सेवा करण्याच्या आमच्या ध्येयाशी सहमत असलेल्या सर्व कंपन्या, संस्था आणि व्यक्तींचे आम्ही मनापासून स्वागत करतो.

एकत्र काम करण्याच्या संधी आणि विशिष्ट CSR उपक्रमांच्या पात्रतेविषयी अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.

चॅट सुरू करा