24 December 2025

पौष पौर्णिमा २०२६ : पौष पौर्णिमेचे महत्त्व, पूजा-विधी व वैदिक महात्म्य

Start Chat

हिंदू परंपरा आणि संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे पौष पौर्णिमा (जिला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात). हा सण भगवान विष्णू आणि देवी शाकंभरी यांना समर्पित आहे. भारतातील काही भागांत या दिवशी सूर्यदेवाचीही पूजा केली जाते.

पौष पौर्णिमा हि नववर्षातली पहिली पौर्णिमा असल्यामुळे त्याचे महत्त्व पुराणांमध्ये विशेष सांगितले आहे. या दिवशी हिंदू घरांमध्ये भगवान सत्यनारायणाची कथा व पूजा केली जाते. ह्या दिवसापासून पौष महिना सुरू होतो, जो पौराणिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. त्याचबरोबर प्रयागराज, कुरुक्षेत्र, हरिद्वार, काशी, नाशिक आणि उज्जैन यांसारख्या पवित्र तीर्थस्थळी जाऊन गंगास्नान केल्यास मोक्षाचे द्वार खुले होते असे सांगितले जाते. पण सर्वांनाच गंगेत स्नान करणे शक्य नसते, अशा वेळी घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्यासही पुण्य लाभते असे मानले जाते. पौष महिन्यात पूजा केल्यास भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात.पौष पौर्णिमेला स्नान व दान केल्याने व्यक्तीला पुण्यप्राप्ती होते.


पौष पौर्णिमा २०२६ मध्ये कधी आहे?

पौष पौर्णिमा: शनिवार, ३ जानेवारी २०२६

पौर्णिमा तिथी सुरू: २ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:५३ वाजता

पौर्णिमा तिथी समाप्त: ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३२ वाजता


पौष पौर्णिमेच्या मागील कथा व महत्त्व

पौष पौर्णिमेशी अनेक पौराणिक कथा आणि दंतकथा जोडलेल्या आहेत. पण सर्वाधिक प्रसिद्ध कथेनुसार, देवी शाकंभरीने पृथ्वीवरील भीषण अन्नटंचाई दूर केली. त्या काळात भक्त अन्नसंकटाला सामोरे जात होते आणि देवीने मुबलक प्रमाणात अन्नधान्य निर्माण करून पृथ्वीवर शांतता प्रस्थापित केली. म्हणूनच हा सण देवी शाकंभरीच्या महिमेची आठवण करून देतो. देवी शाकंभरी ही देवी दुर्गेचे रूप आणि देवी भगवतीची अवतार असल्याने, जगभरातील असंख्य भक्त श्रद्धेने तिची पूजा करतात.


पौष पौर्णिमा विधी

पहाटे लवकर उठून पौष पौर्णिमा व्रताचा संकल्प करावा

त्रिवेणी संगमात किंवा गंगा नदीत स्नान करावे तसे शक्य नसल्यास, स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे

सूर्य मंत्राचा जप करत सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे

विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करावे

श्री सत्यनारायण पूजा घरात घालावी, तसे करता येत नसेल तर जिथे पूजा होत असेल तिथे जाऊन सत्यनारायण कथेचे श्रवण करावे


पौष पौर्णिमेचे उपाय

घरात सुख-समृद्धी येण्यासाठी आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी सकाळी स्नान करून मुख्य दरवाज्यावर अशोकाची किंवा आंब्याची पाने लावावीत. यामुळे माता लक्ष्मी घरात वास करते

पौर्णिमेच्या दिवशी घरी भगवान सत्यनारायणाची कथा ऐकल्यास अत्यंत शुभ फल मिळते. माता लक्ष्मीच्या व्रतासह श्रीहरीची पूजा केल्याने सर्व दुःख व संकटे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते

असे मानले जाते की जी व्यक्ती पौर्णिमेच्या रात्री झोपते, तिचे भाग्यही झोपते. जे जागरण करतात त्यांच्या घरी माता लक्ष्मी वास करते. या जागरणाचे फळ हजारो वर्षांच्या तपस्येइतके मानले जाते

या दिवशी स्नानानंतर विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्यास घरात धनवृद्धी होते

पौष पौर्णिमेला थंडीपासून संरक्षण देणाऱ्या वस्तूंचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. खिचडी, चादरी, कपडे तसेच तीळ व गुळापासून बनवलेले पदार्थ दान करावेत आणि सेवन करावे

निष्कर्ष

नवीन सुरुवात आणि समृद्धीसाठी समर्पित असलेली पौष पौर्णिमा हिला हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये विशेष महत्व आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. श्री विष्णू आणि शाकंभरी देवीला हि पौष पौर्णिमा समर्पित केली गेली आहे ती श्रद्धेने पाळल्यास जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आणि देवांचा आशीर्वाद व कृपा प्राप्त होते. पौष पौर्णिमेचे महत्त्व अंधार आणि निराशा दूर करून एका चांगल्या उद्याच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देते.

अन्न ही मानवी गरजांपैकी सर्वात मूलभूत अशी गरज आहे, परंतु दुर्दैवाने, वंचित वर्गासाठी अन्नाची कमतरता ही आज जगासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. आजही समाजातील वंचित घटकांतील असंख्य लोक आहेत, ज्यांना एक वेळचे जेवणही परवडत नाही आणि त्यांना उपाशी पोटी झोपावे लागते. म्हणूनच नारायण सेवा संस्थानाने गेल्या काही वर्षांमध्ये, ३०० दशलक्षाहून अधिक गरजूंना मोफत अन्न पुरविले  आहे .आमच्या ह्या उपक्रमात ४०००हून अधिक लोकांना न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवण अशा दिवसातील ३ वेळेच्या जेवणासाठी आम्ही मोफत अन्न देतो. 

हिंदू धर्मात अन्नदान हे महादान मानले जाते. म्हणूनच  गरिबांना अन्नदान करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे,  कारण अन्नासाठी एक छोटीशी देणगी सुद्धा आपल्याला अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. आपण केलेली १५०० रुपयाची छोटीशी देणगी सुद्धा आम्हाला ५० गरजू आणि दिव्यांग व्यक्तींसाठी अन्न पुरवू शकते. देणगी देण्यासाठी इथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्रश्न: पौष पौर्णिमा म्हणजे काय?
उत्तर: पौष पौर्णिमा ही नववर्षातील पहिली पौर्णिमा असून तिला पुराणांमध्ये विशेष महत्त्व आहे. ही शाकंभरी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी स्नान, दान व सत्यनारायण पूजेने पुण्यप्राप्ती होते, अशी मान्यता आहे.

प्रश्न: पौष पौर्णिमा कधी आहे?
उत्तर: शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी पौष पौर्णिमा आहे. तिथी २ जानेवारी सायंकाळी ६:५३ वाजता सुरू होऊन ३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३२ वाजता समाप्त होईल.

प्रश्न: पौष पौर्णिमेला काय करावे?
उत्तर: या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे, विष्णू सहस्रनाम पठण करावे, रात्र जागरण करावे आणि श्री सत्यनारायण कथा श्रवण करावी.

प्रश्न: पौष पौर्णिमेचे महत्त्व काय आहे?
उत्तर: देवी शाकंभरीने पृथ्वीवरील अन्नटंचाई दूर केली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ती अन्न, समृद्धी आणि सुखाची देवी मानली जाते.

प्रश्न: पौष पौर्णिमेला काय टाळावे?
उत्तर: या दिवशी मीठ सेवन टाळावे, मांसाहार करू नये आणि मद्यपानापासून दूर राहावे.

प्रश्न: पौष पौर्णिमेला कोणत्या देवतांची पूजा केली जाते?
उत्तर: या दिवशी देवी शाकंभरी, भगवान विष्णू आणि सूर्यदेव यांची पूजा केली जाते.

प्रश्न: पौष पौर्णिमेला श्री सत्यनारायण कथेचे महत्त्व काय आहे?
उत्तर: पौष पौर्णिमेला सत्यनारायण कथा केल्यास भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते आणि भक्तांना सुख, यश व समृद्धी लाभते.

X
Amount = INR