महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य आहे असले तरी दिव्यांग नागरिकांच्या संदर्भात अनेक मूलभूत अडचणी आजही राज्यात कायम आहेत. Census of India नुसार राज्यात सुमारे २९ लाखांहून अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत, आणि तज्ञांच्या मते प्रत्यक्ष संख्या यापेक्षा अधिक असू शकते. कारण हे सर्वेक्षण २०११ चे आहे. नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (NSO) चे सर्वेक्षण सुद्धा २०१८ मध्ये झाले आहे. NSO ही भारत सरकारची प्रमुख सांख्यिकी संस्था आहे. ती Ministry of Statistics and Programme Implementation (MoSPI) अंतर्गत कार्य करते. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न (GDP) आणि इतर आर्थिक निर्देशांकां बरोबरच रोजगार, शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेती, दिव्यांग स्थिती इत्यादी विषयांवर डेटा गोळा करते. ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्यसेवा, निदान केंद्रे, विशेष शिक्षण आणि पुनर्वसन सुविधा अत्यल्प आहेत. अनेक कुटुंबांना योग्य माहिती, मार्गदर्शन आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या योजना असूनही त्या सर्वांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाहीत. ह्यामुळे दिव्यांग व्यक्ती ज्या कठीण परिस्थितीत आहेत त्याच परिस्थितीत कायम राहतात. आपण दुसऱ्यावर भार पडतोय, दुसऱ्याच्या आधाराशिवाय जगू शकत नाही ह्या परावलंबी भावनेने त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे दिव्यांग व्यक्ती अबोल होऊन जातात किंवा खूप खूप चिडचिडे होऊन जातात. दिव्यांगांच्या ह्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, त्यांचे पुनर्वसन करणे हि काळाची गरज आहे.
नारायण सेवा संस्थान मागील ४ दशकापासून दिव्यांग व्यक्तींच्या समस्येवर गंभीरपणे कार्य करत आहे. १९८५ पासून सुरु झालेली नारायण सेवा संस्थान दिव्यांगांच्या सबलीकरणासाठी व सक्षमीकारणासाठी विविध उपक्रम राबवित आहे. संस्था ४-५ वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत आहे:
लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत अनेक व्यक्तीमध्ये लहानपणापासून काही तरी अधूपणा असतो, काहींचे पाय वाकडे असतात, कोणाचे हाताची बोटे निकामी असतात ज्यामुळे त्या व्यक्ती दुसऱ्याच्या आधारावर जीवन तिष्ठत राहतात. नारायण सेवा संस्थानामध्ये आल्यावर त्यांच्या अधूपणाची नीट वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्यांच्यावर आधुनिक पद्धतीने योग्य शस्रक्रिया केली जाते. शस्रक्रियेनंतर त्यानां समुपदेशन केले जाते, नीट बरे होईपर्यंत संस्थेचे डॉक्टर आणि कर्मचारी त्यांची काळजी घेतात.
बऱ्याच लोकांचे काही अपघातांमुळे किंवा काही आजारांमुळे हात किंवा पाय कापावे लागतात त्यामुळे परिस्थितीने आलेला अधूपणा घेऊन ते जगत असतात. नारायण सेवा संस्थानामध्ये भारतातील पहिले आधुनिक कृत्रिम अवयव उत्पादन केंद्र स्थापन केले गेले आहे. जिथे समाजातील वंचित घटकातील दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप केले जाते. संस्थेची प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स विशेष तज्ञांची टीम सुनिश्चित करते की जे अवयव संस्थेच्या केंद्रात बनविले जातात त्यांचे मोजपाप लाभार्थीच्या अचूक मोजमापानुसार बनविले जाईल ज्यामुळे ते उत्तम प्रकारे रुग्णांना फिट होईल. संस्थेची अत्याधुनिक प्रगत अशी प्रयोगशाळा आहे जिथे प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स अभियंत्यांच्या कुशल टीमद्वारे तयार केले जातात. संस्था बारकाईने ह्याकडे लक्ष्य देते कि जे लाभार्थी आहेत जे कृत्रिम हात किंवा पाय घेत आहेत त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य कसे करता येईल. त्याचबरोबर जोपर्यंत त्यांना त्यांच्या नवीन अवयवांची आणि त्यांच्या कार्यक्षमतेची सवय होत नाही तोपर्यंत संस्थेचे कर्मचारी त्यांना आवश्यक ती मदत पुरवतात तसेच योग्य मार्गदर्शन देतात.
नारायण सेवा संस्थानमध्ये देशभरातून उपचारासाठी हजारो दिव्यांग व्यक्ती येतात आणि त्यांच्यावर उपचार हि केले जातात. उपचारांबरोबर त्यांना पोषक आहार मिळाला तर त्यांची तब्येत लवकर सुधारते म्हणूनच संस्था दिव्यांगांना आणि रुग्णांना मोफत ‘पौष्टिक भोजन‘ पुरवते. औषधांइतकेच महत्त्व आहाराला आहे हे जाणून संस्था त्यांच्या पोषणाची पूर्ण काळजी घेते. एवढेच नाही तर रुग्णांबरोबर आलेल्या नातेवाइकांना सुद्धा नियमितपणे आहार दिला जातो . आज पर्यंत जवळजवळ ४ करोड व्यक्तींना संस्थेने पौष्टिक अन्न पुरविले आहे.
दिव्यांगांना कृत्रिम अवयव मिळाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात नवा आत्मविश्वास निर्माण होतो; मात्र नारायण सेवा संस्थानाचे कार्य तेवढ्यावरच मर्यादित राहत नाही. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती आत्मनिर्भर व्हावी, या उद्दिष्टाने संस्थेमार्फत कौशल्य विकासाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. आजपर्यंत अनेक दिव्यांगांना शिवणकलेचे प्रशिक्षण देऊन त्यांना उत्कृष्ट दर्जाचे वस्त्रनिर्मितीचे कौशल्य प्राप्त करून देण्यात आले आहे. स्वतःच्या हातांनी काहीतरी घडवण्याचा आनंद त्यांच्या आत्मविश्वासाला नवी उंची देतो. दिव्यांगांना व्यवसायाभिमुख कौशल्यांनी सक्षम करून स्वावलंबी बनवणे, हाच नारायण सेवा संस्थानाचा खरा ध्यास आहे. शिवणकामाबरोबरच मोबाइल रिपेअरिंग, कॉम्प्युटर प्रशिक्षण असे विविध कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षणे नारायण सेवा संस्थान दिव्यांगांना देत आहे.
दिव्यांग व्यक्तींनाही संसाराचा आणि सहजीवनाचा पूर्ण अधिकार आहे. समाजातील आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अडचणींमुळे अनेक दिव्यांग युवक-युवतींचे विवाह होत नाहीत. नारायण सेवा संस्थान ह्या समस्येला तोडगा म्हणून सामूहिक विवाह सोहळे आयोजित करते, ज्यामुळे दिव्यांगांच्या आयुष्यात नवी आशा आणि आत्मविश्वास निर्माण करते. दिव्यांगांचे सामूहिक विवाह हा केवळ एक सोहळा नसून सामाजिक समावेशाचा आणि सन्मानाचा उत्सव असतो.
वर दिलेल्या कुठल्याही कार्यक्रमात किंवा उपक्रमात कुठलेही शुल्क घेतले जात नाही. दिव्यांगांचे सबलीकरण व सक्षमीकरण ह्यासाठी सध्याच्या घडीला नारायण सेवा संस्थान हि देशातील काही सर्वोत्तम कार्य करणाऱ्या संस्थापैकी एक आहे. दिव्यांग व्यक्तींचे कल्याण ह्या क्षेत्रातील कार्यासाठी नारायण सेवा संस्थानाला आतापर्यंत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. नारायण सेवा संस्थानाचे हे सेवाभावी व सातत्यपूर्ण कार्य पाहून लाखो दानशूर व्यक्ती संस्थेला सहकार्य करावयास पुढे येतात. त्यांनी दिलेल्या अनमोल सहकार्याने संस्थानाचे कार्य अविरतपणे सुरु आहे. आपल्या एका छोट्या मदतीने सुद्धा तुम्ही नारायण सेवा संस्थानाच्या ह्या सामाजिक कार्याचे भाग होऊ शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रश्न १: महाराष्ट्र राज्यात किती दिव्यांग व्यक्ती आहेत? आकडेवारी काय सांगते?
उत्तर: Census of India नुसार महाराष्ट्रात सुमारे २९ लाखांहून अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत. प्रत्यक्षात ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे, कारण शेवटचा सर्वेक्षण २०१८ मध्ये National Statistics Office (NSO) यांनी केला होता.
प्रश्न २: National Statistics Office (NSO) चे नेमके कार्य काय आहे?
उत्तर: NSO ही भारत सरकारची प्रमुख सांख्यिकी संस्था आहे. ती Ministry of Statistics and Programme Implementation (MoSPI) अंतर्गत कार्य करते. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न (GDP) आणि इतर आर्थिक निर्देशांकांसोबतच रोजगार, शिक्षण, आरोग्य, उद्योग, शेती, दिव्यांग स्थिती इत्यादी विषयांवर डेटा गोळा करणे व विश्लेषण करणे हे तिचे प्रमुख कार्य आहे.
प्रश्न ३: शासनाच्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचत का नाहीत?
उत्तर: ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागात आरोग्यसेवा, निदान केंद्रे, शिक्षण व पुनर्वसन सुविधा अत्यल्प आहेत. तसेच अनेक कुटुंबांना योग्य माहिती, मार्गदर्शन आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मदत मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या योजना असूनही त्या दिव्यांगांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाहीत.
प्रश्न ४: नारायण सेवा संस्थान कधीपासून कार्यरत आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे?
उत्तर: नारायण सेवा संस्थान १९८५ पासून कार्यरत आहे. दिव्यांगांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
प्रश्न ५: नारायण सेवा संस्थानचे प्रमुख उपक्रम कोणते आहेत?
उत्तर: नारायण सेवा संस्थान दिव्यांगांवर आवश्यक शस्त्रक्रिया करते आणि गरजेनुसार कृत्रिम अवयव पुरवते. संस्थेत दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णाला व त्यांच्या नातेवाईकांना पौष्टिक आहार दिला जातो. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाते. तसेच समाजात समानतेची भावना निर्माण करण्यासाठी सामूहिक विवाहांचे आयोजन केले जाते.