दरवर्षी दीपावलीच्या या उत्सवी दिवसांत आपल्या घरात एक वेगळाच आनंद दाटून येतो. दिव्यांचा मंद उजेड, सुगंधी फुलांचा गंध, गोड पदार्थांचा सुवास आणि भक्तीभावाने सजलेले मंदिर – हे सर्व मिळून एक अनोखा उत्सवाचा अनुभव देतात. याच पवित्र वातावरणात साजरा होतो लक्ष्मीपूजनाचा सोहळा, जो आपल्या जीवनातील समृद्धी, समाधान आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो.
लक्ष्मीपूजन केवळ देवतेची पूजा नाही, तर आपल्या कुटुंबातील ऐक्य, आनंद आणि भरभराटीची प्रार्थना आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या घरी येऊन धनधान्य, सौख्य आणि शांतीचा आशीर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच या दिवशी प्रत्येक घर, दुकान आणि कार्यालय सजवले जाते, स्वच्छ केले जाते आणि दिव्यांनी उजळवले जाते.
पुराणांनुसार समुद्रमंथनाच्या वेळी लक्ष्मीदेवी क्षीरसागरातून प्रकट झाल्या. त्या दिवशी म्हणजे कार्तिक अमावस्येला, देव-दानवांनी केलेल्या मंथनातून ऐश्वर्य, सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीदेवीने प्रकट होऊन सर्वांना आशीर्वाद दिले. त्यामुळे कार्तिक अमावस्या हा दिवस समृद्धीच्या स्वागताचा मानला जातो.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी वर्गासाठीही विशेष महत्त्व असते. नवीन हिशोबाची पुस्तके (बहि-खाते) या दिवशी पूजली जातात. हा दिवस नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात मानला जातो आणि व्यवसाय वृद्धीची प्रार्थना केली जाते.
या वर्षी लक्ष्मीपूजनाची तारीख व शुभ मुहूर्त:
लक्ष्मीपूजन सोमवार, 21 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा होणार आहे। पुणे शहरात मुहूर्त अंदाजे संध्याकाळी 6:00 ते 8:40 वाजेपर्यंत IST मानला आहे.
लक्ष्मी पूजन कसे करावे
दार वर्षी संध्याकाळच्या वेळी पंचांगात दिलेल्या शुभ मुहूर्तावर घरा घरात लक्ष्मी पूजन केले जाते. या विधीला एका कलशात पाण्यामध्ये रुपया, सुपारी आणि अंगठी घेऊन त्याला वरून आंब्याची पाने व नारळाने झाकले जाते. नंतर या कलशाला गंध, हळद कुंकू लावून सजवले जाते. या नंतर एका वाटीत लाह्या व एका वाटीत बत्तासे घेतले जातात. एका वस्त्रावर हे मांडून देवा समोर दागिने व अन्य धनाचे देवासमोर पूजन केले जाते. या विधीला लक्ष्मी अष्टक व आरती करून विधी पार पडला जातो. प्रत्येक धन व लाह्या बताश्यांच्या वाट्यांवर हाथ ठेऊन त्यांच्या वृद्धीची प्रार्थना केली जाते.
लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ धनप्राप्ती नव्हे तर आध्यात्मिक आणि सामाजिक समाधान देखील आहे. या दिवशी कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात, एकत्र पूजा करतात, गोड पदार्थ वाटतात आणि आनंद साजरा करतात. हे एकत्रिकरण कुटुंबातील बंध अधिक मजबूत करते.
जशी आपण आपल्या घरासाठी लक्ष्मीचे स्वागत करतो, तशीच समाजातील वंचितांसाठीही मदतीचा दिवा पेटवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. खऱ्या अर्थाने लक्ष्मीची कृपा तीच, जी इतरांना सुख देण्यातून मिळते.
याच भावनेतून नारायण सेवा संस्थान वर्षानुवर्षे गरजूंसाठी निःस्वार्थ सेवा करत आहे दिव्यांगांसाठी मोफत ऑपरेशन, शिक्षण, पुनर्वसन, अनाथांसाठी निवारा आणि महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण अशी अनेक उपक्रम संस्था राबवते.
या लक्ष्मीपूजनाच्या पवित्र दिवशी, आपल्या छोट्याशा दानातून कोणाचे जीवन उजळू शकते. आपल्या मदतीने एखाद्या कुटुंबाच्या घरातही दिवाळी साजरी होऊ शकते.यासाठी:
लक्ष्मीपूजन हा केवळ आपल्या घरासाठी समृद्धी मिळवण्याचा दिवस नाही, तर संपूर्ण समाजासाठी आनंद निर्माण करण्याची संधी आहे. या वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, आपल्या घराबरोबर इतरांच्या जीवनातही समृद्धीचा दिवा पेटवा.
नारायण सेवा संस्थानला आपले योगदान द्या आणि आपल्या दानातून कोणाच्या चेहऱ्यावर हास्य आणा.
कारण खरी लक्ष्मी तीच जी इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणते.
प्रश्न: लक्ष्मीपूजन का साजरे केले जाते?
उत्तर: लक्ष्मीपूजन देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि घरातील समृद्धीसाठी साजरे केले जाते.
प्रश्न: लक्ष्मीपूजनाची कथा काय आहे?
उत्तर: कार्तिक अमावस्येला समुद्रमंथनातून लक्ष्मीदेवी प्रकट झाल्या व समृद्धीचा आशीर्वाद दिला, हीच लक्ष्मीपूजनाची कथा आहे.
प्रश्न: कुटुंबातील लक्ष्मीपूजनाचे महत्त्व काय आहे?
उत्तर: हे कुटुंबातील ऐक्य वाढवते, सकारात्मक ऊर्जा आणते आणि घरात शांती व भरभराट निर्माण करते
प्रश्न: लक्ष्मीपूजनाला कोणते विशेष विधी केले जातात?
उत्तर: घराची स्वच्छता, दिव्यांची रांगोळी, लक्ष्मी-गणेश पूजन आणि नवीन बहिखात्यांचे पूजन केले जाते
प्रश्न: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दान का करावे?
उत्तर: दान केल्याने इतरांच्या जीवनात प्रकाश येतो आणि समाजातील खरी समृद्धी वाढते.