२६ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली दिवस आहे. १९५० साली याच दिवशी भारताचे संविधान अंमलात आले आणि आपला देश खऱ्या अर्थाने एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य झाला. गणतंत्र दिन हा केवळ उत्सव नसून तो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची आठवण करून देणारा दिवस आहे.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले; परंतु २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान अंमलात आले. या नव्या संविधानाने ब्रिटिश काळातील भारत सरकार कायदा, १९३५ याची जागा घेतली आणि भारताला पूर्णपणे स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्थापित केले.
२६ जानेवारी ही तारीख निवडण्यामागे १९३० साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केलेल्या पूर्ण स्वराज्याच्या जाहीरनाम्याचा सन्मान करण्याचा उद्देश होता. या जाहीरनाम्यात ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली होती.
भारतीय संविधान हे जगातील सर्वात व्यापक आणि लोककल्याणकारी संविधानांपैकी एक आहे.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क दिले आहेत—स्वातंत्र्य, समानता, धर्मस्वातंत्र्य आणि न्यायाचा अधिकार. मात्र संविधान हे इतक्यावरच थांबत नाही; ते आपल्यावर मूलभूत कर्तव्यांची जबाबदारीही सोपवते. कारण हक्क आणि कर्तव्ये यांचा समतोल राखल्याशिवाय लोकशाही टिकू शकत नाही.
संविधान केवळ एक पुस्तक नसून ते प्रत्येक भारतीयाला मिळालेले सुरक्षा कवच आहे.
हे सर्व असले तरी १३० करोड लोकसंख्या असलेल्या आपल्या ह्या देशात आजही समाजातील अनेक घटक—गरीब, शोषित, वंचित अनेक मूल्यांपासून दूर आहेत. अशावेळी संविधान केवळ पुस्तकात न राहता आपल्या वर्तनात आणि निर्णयांमध्ये उतरले पाहिजे.
संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत, पण त्यासोबतच काही मूलभूत कर्तव्येही सांगितली आहे
देशाचा आदर करणे: राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा सन्मान करणे.
सार्वजनिक मालमत्ता जपणे: रस्ते, गाड्या, स्मारके ही आपली संपत्ती आहे, तिचे नुकसान टाळणे.
बंधुभाव राखणे: जात, धर्म आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी प्रेमाने तसेच आपुलकीने वागणे.
कर्तव्ये: आजच्या काळात हक्कांसाठी भांडणारे अनेक लोक आहेत, पण कर्तव्यांची जाणीव ठेवणारे कमी आहेत. पर्यावरणाचे रक्षण करणे आणि संविधानाप्रती निष्ठा राखणे हे आपले परम कर्तव्य आहे.
आजच्या काळात या कर्तव्यांचा अर्थ अधिक व्यापक झाला आहे:
खरी देशसेवा ही मोठ्या व्यासपीठावरच होते असे नाही; ती रोजच्या छोट्या कृतीतूनही होते.
समाज तेव्हाच प्रगत होतो, जेव्हा त्यातील दुर्बल घटकही आत्मविश्वासाने उभे राहतात. गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, कुपोषण ह्या केवळ शासकीय समस्या नाहीत, तर सामाजिक जबाबदाऱ्या आहेत.
या कृतीतूनच सामाजिक मूल्ये जिवंत राहतात.
प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या लोकशाहीचा वाढदिवस! हा दिवस साजरा करताना आपण एक संकल्प करूया – “मी केवळ हक्क मागणारा नागरिक न होता, कर्तव्य बजावणारा एक जबाबदार भारतीय बनेन.” जेव्हा आपण संविधानाचा आदर करू आणि सामाजिक मूल्ये जपू, तेव्हाच आपला भारत खऱ्या अर्थाने ‘सुजलाम् सुफलाम्’ होईल.
संविधानाने समाजातील प्रत्येक नागरीकाला समान शिक्षण मिळावे हा हक्क दिला आहे पण आज समाजातील अनेक घटकांना परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. पण नारायण सेवा संस्थानाने हजारो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. केवळ एवढेच नव्हे तर पारंपारिक शिक्षणाबरोबरच ह्या मुलांना स्मार्ट क्लास आणि कॉम्प्युटर लॅब द्वारे प्रगत शिक्षण दिले जात आहे. उद्याच्या भारताचे भवितव्य उज्वल करण्यासाठी सर्व घटकांना योग्य शिक्षण देणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच नारायण सेवा संस्थान प्रयत्नशील आहे आणि कार्य करत आहे. आमच्या ह्या कार्याला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. एका उपेक्षित मुलाच्या वर्षभराच्या शिक्षणासाठी आपण एक छोटीशी मदत करू शकता त्यासाठी येथे क्लिक करावे.
प्रश्न: गणतंत्र दिन का साजरा केला जातो?
उत्तर: भारताचे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारी रोजी गणतंत्र दिन साजरा केला जातो.
प्रश्न: संविधानाचे समाजातील महत्त्व काय आहे?
उत्तर: भारतीय संविधान समाजाला न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा मजबूत पाया देते. ते लोकशाही मूल्ये जपते आणि प्रत्येक नागरिकाला हक्क व संरक्षण प्रदान करते.
प्रश्न: मूलभूत कर्तव्ये का महत्त्वाची आहेत?
उत्तर: मूलभूत कर्तव्यांमुळे नागरिक जबाबदार बनतो. त्यातून समाजात शिस्त, एकता, सामाजिक सलोखा आणि समान न्याय प्रस्थापित होण्यास मदत होते.
प्रश्न: गरिबांच्या उन्नतीसाठी नागरिक काय करू शकतात?
उत्तर: नागरिक अन्नदान, शैक्षणिक सहाय्य, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती, स्वयंसेवी कार्य आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गरिबांच्या उन्नतीसाठी योगदान देऊ शकतात.
प्रश्न: गणतंत्र दिनी कोणता संकल्प करावा?
उत्तर: संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याचा, देशासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याचा आणि समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करण्याचा संकल्प करावा.