27 February 2026

महाराष्ट्रातील गरजू मुलांसाठी शिक्षण दान

Start Chat

शिक्षण दान: महाराष्ट्राच्या उद्याच्या पिढीसाठी एक मदतीचा हात

“विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.”

महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेले हे विचार आजही तितकेच जिवंत आणि मार्गदर्शक आहेत. महाराष्ट्र ही संतांची आणि समाजसुधारकांची पवित्र भूमी आहे. शिक्षणाची गंगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचावी म्हणून सावित्री बाई फुले यांनी शेण-गोट्यांचा मार सहन केला; मात्र दुर्दैवाने आजही महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांत अशी मुले आहेत, ज्यांच्या डोळ्यांत स्वप्नांची चमक आहे, पण हातात पुस्तकं घेण्यासाठी आवश्यक पैसे नाहीत

महाराष्ट्रात मुंबई तसेच पुणे सारखी प्रगत आणि आधुनिक शहरे असली तरी मेळघाटच्या दुर्गम पाड्यांत, मुंबई पासून जवळच असलेल्या वाडा जव्हार सारख्या आदिवासी पाड्यात, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांत आणि मुंबई–पुण्यासारख्या महानगरांतील झोपडपट्ट्यांमध्ये हजारो मुले शिक्षणापासून वंचित आहेत. कुणाचे वडील मजूर, तर कुणाची आई धुणीभांडी करून संसार चालवते. अशा परिस्थितीत पोटाची खळगी भरायची की शाळेची फी द्यायची, हा कठीण प्रश्न त्यांच्या आयुष्यापुढे उभा ठाकतो.


शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या मुलांच्या खालीलप्रमाणे काही समस्या आहेत:

  • आर्थिक परिस्थिती: गरिबीमुळे फी भरणे किंवा शैक्षणिक साहित्य खरेदी करणे अशक्य आहे
  • दुर्गम भाग: मेळघाट किंवा सह्याद्रीच्या रांगांमधील गावांमध्ये शाळांची कमतरता आहे आणि शिक्षकांची संख्या पण कमी आहे.
  • डिजिटल दरी: ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा इंटरनेटचा अभाव.
  • कौटुंबिक परिस्थिती: पालकांच्या अज्ञानामुळे मुलांना लहान वयातच मजुरीसाठी जुंपले जाते किंवा तशी सक्ती केली जाते.
  • मुलगा-मुलगी भेदभाव : अजूनही मुलीपेक्षा मुलगा शिकला तर कुटुंबाचे भले होईल अशी धारणा काही पालकांची आहे त्यामुळे मुली शाळेत जाऊ शकत ना

ह्या परिस्थिती मध्ये बदल घडवायचा असेल तर प्रत्येकाने कुठल्याना कुठल्या पद्धतीने योगदान द्यावे लागेल आणि तेच खऱ्या अर्थाने शैक्षिणक अर्थात शिक्षण दान असेल. अनेकांना वाटते की दान म्हणजे फक्त पैसे देणे. पण ‘शिक्षण दान‘ ही संकल्पना खूप मोठी आहे. ह्यामध्ये आपण कश्या प्रकारे सहभागी होऊ शकता ते बघूया

 

१. ज्ञान दान: आपल्याकडे असलेले शिक्षण लोकांना देणे, मोफत आपण मुलांना शिकवू शकता, शिकवण्या घेऊ शकता

२. वस्तू दान: शिक्षण साहित्य जसे पुस्तके, वह्या, स्टेशनरी, दप्तरे, युनिफॉर्म्स (गणवेश) हे आपण देऊ शकता

३. मार्गदर्शन: गरजू मुलांना करिअर  बद्दल मार्गदर्शन देऊ शकता

४. कौशल्याधारित प्रशिक्षण: मुलांना कंप्यूटर शिकवू शकता किंवा पेंटिंग, शिवणकाम किंवा एखादी भाषा येत असेल, तर ती मुलांना शिकवा. ह्याचा फायदा असा होईल कि भविष्यात हि मुले स्वतःच्या पायावर उभी राहू शकतील आणि त्यांना रोजगारासाठी कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.

५. मुलींच्या शिक्षणावर भर: ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ मुलगी शिकली कि तिच्याबरोबरच घरातल्या सर्वांना शिक्षणाचे मोल काय आहे ते दाखवते आणि त्यांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्नशील राहते.

६. वाचनालयाची निर्मिती: गावातली एका मुलाला पुस्तके देण्याच्या ऐवजी गावात एक छोटे ‘सामुदायिक वाचनालय’ सुरू करणे जास्त फायदेशीर ठरते. यामुळे गावातील सर्व मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल.

७. सरकारी योजनांची किंवा स्कॉलरशिपची माहिती: अनेकदा सरकारच्या गरिबांच्या शिक्षणासाठी अनेक योजना किंवा शिष्यवृत्त्या असतात ज्याची माहिती गरजवंतांना आपण देऊ शकता

८. समुपदेशन: मुलांना सर्वात जास्त गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. त्या मुलांचे मेंटॉर बना त्यांची शिक्षणात कशी प्रगती होत आहे ते जाणून घ्या, त्यांना प्रोत्साहन देत जा.

 

तुमच्या मनामध्ये असे पण येईल कि मी एकट्याने करून काय होणार आहे पण ‘थेंबे थेंबे तळे साचे ‘ हा विचार घेऊन हे शिक्षण दान सुरु ठेवा.

एका मुलाला दिलेल्या शिक्षण दानाने तो मुलगा शिकून मोठा होतो, स्वतःची प्रगती करतो आणि कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. एक सुशिक्षित नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीत हातभार लावतो आणि हेच खऱ्याअर्थाने राष्ट्र निर्माण आहे.

 

 

नारायण चिल्ड्रेन अकादमी मध्ये वंचित पार्श्वभूमीतील मुलांसाठी शिक्षणाबरोबरच मोफत दुपारचे जेवण, गणवेश, स्टेशनरी, वाहतूक आणि आरोग्य सेवा यांचा समावेश केला आहे. त्याचबरोबर त्यांना अत्याधुनिक डिजिटल पद्धतीने शिक्षण दिले जाते ज्याने त्यांची शिक्षणाबद्दलची रुची वाढत जाते. मुलांच्या शिक्षणासाठी देणगी देऊन समाजाच्या विकासासाठी आपण आमच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊ शकता.

आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि देणगीदारांकडून मिळालेल्या अमूल्य पाठिंब्यामुळे आम्ही हजारो मुलांचं जीवन बदलण्यात यशस्वी झालो आहोत.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न १: समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे ह्यासाठी महाराष्ट्रात कोणी चळवळ उभारली?
उत्तर: महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सर्व स्तरातील लोकांना शिक्षण देण्यासाठी चळवळ उभारली.

प्रश्न २: शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या मुलांच्या प्रमुख समस्या काय आहेत?
उत्तर: आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक अडचणी, दुर्गम भागातील राहणीमान, मुलगा-मुलगी भेदभाव आणि इंटरनेटचा अभाव या प्रमुख समस्या आहेत.

प्रश्न ३: मुलांसाठी शिक्षणासंबंधित कोणत्या सरकारी योजना आहेत?
उत्तर: समग्र शिक्षा अभियान, बालसंगोपन योजना आणि कस्तूरबा गांधी बालिका विद्यामंदिर या प्रमुख योजना आहेत. कस्तूरबा गांधी बालिका विद्यामंदिर योजनेअंतर्गत ग्रामीण व मागास भागातील मुलींना मोफत शिक्षण, निवास आणि जेवणाची सुविधा दिली जाते.

X
Amount = INR