01 November 2022

दानधर्माचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत?

Start Chat

२०२१ च्या जागतिक दान निर्देशांक अहवालानुसार, जगातील सर्वात उदार देशांमध्ये भारताने १४ वा क्रमांक पटकावला आहे. भारतात ३० लाखांहून अधिक सेवाभावी संस्था आहेत , ज्या समाजातील विविध घटकांना मदत करण्याचे काम करतात.

गेल्या काही वर्षांत देशातील दात्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. आजकाल, जवळपासची दान संस्था शोधणे खूप सोपे झाले आहे. दान करण्यासाठी योग्य संस्था शोधण्याकरिता, कोणीही ‘ माझ्या जवळ अन्नदान’ , ‘माझ्या जवळची दान संस्था’, ‘माझ्या जवळचे मुलांचे अनाथाश्रम’ इत्यादी शीर्षके गुगलवर शोधू शकतो.

याचे कारण असे आहे की, आज भारतात विविध प्रकारच्या सेवाभावी संस्था आहेत ज्या अनेक धर्मादाय हेतूंसाठी काम करतात.

धर्मादाय संस्थांचे प्रकार

धर्मादाय संस्था सार्वजनिक किंवा खाजगी असू शकते.

सार्वजनिक धर्मादाय संस्था- या धर्मादाय संस्थांचे कोणतेही विशिष्ट लाभार्थी नसतात आणि त्या समाजातील विशिष्ट घटकांच्या किंवा गटांच्या फायद्यासाठी स्थापन केल्या जातात. या संस्थांचे व्यवस्थापन विश्वस्त मंडळाद्वारे हाताळले जाते.

खाजगी संस्था- या संस्थांना सहसा एक किंवा काही लाभार्थी असतात. या संस्थांचे व्यवस्थापन बहुतेकदा एका व्यवस्थापक विश्वस्ताद्वारे किंवा काही नियुक्त विश्वस्तांद्वारे हाताळले जाते.

असे अनेक धर्मादाय उद्देश आहेत ज्यासाठी दाता साधनसामग्री किंवा पैशाचे दान करू शकतो . याच्या आधारावर विविध प्रकारच्या धर्मादाय संस्थांची स्थापना केली जाते. त्या पुढीलप्रमाणे आहेत-

आरोग्य धर्मादाय संस्था

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असल्याने, सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत भारतालाही स्वतःच्या समस्या आहेत. या समस्या सामान्यतः आरोग्याच्या धोक्यांविषयी जनजागृतीचा अभाव, कुपोषण, वैद्यकीय सुविधांची कमतरता इत्यादींशी संबंधित असतात. त्यामुळे, देशात अशा अनेक आरोग्यविषयक सेवाभावी संस्था आहेत, ज्या या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्या सोडवण्यासाठी कार्य करतात.

शैक्षणिक धर्मादाय संस्था

भारतातील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे शिक्षणाचा अभाव. २०२२ च्या राष्ट्रीय सर्वेक्षण अहवालानुसार, भारताचा साक्षरता दर ७७.७ टक्के आहे, याचा अर्थ असा की प्रत्येक चार भारतीयांपैकी एक जण शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहे.

त्यामुळे, देशात वंचित लोकांना शिक्षण देण्यासाठी काम करणाऱ्या विविध शैक्षणिक सेवाभावी संस्था आहेत. नारायण सेवा संस्थान हे त्यापैकीच एक आहे. हे संस्थान गरीब मुलांना आणि दिव्यांगांना मोफत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहे . त्यामुळे, एखादी व्यक्ती अशा सेवाभावी संस्थांना देणगी देऊन शिक्षणासाठी दान करू शकते.

प्राणी धर्मादाय संस्था

प्राणी कल्याण संस्थांचे मुख्य उद्दिष्ट प्राण्यांचे (विशेषतः लुप्तप्राय प्राण्यांचे) संरक्षण करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणे हे असते. विविध प्राणी निवारा केंद्रे उपलब्ध करून देणे, त्यांच्या उपचारांमध्ये मदत करणे, प्राण्यांची सुटका करणे इत्यादी मार्गांनी त्या हे कार्य करू शकतात.

पर्यावरण धर्मादाय संस्था

भारत जैवविविधतेने समृद्ध आहे, तथापि, तो सर्वाधिक प्रदूषित देशांपैकी एक देखील आहे. पाण्याची टंचाई, जंगलतोड, जलप्रदूषण इत्यादी काही प्रमुख समस्या देशाला भेडसावत आहेत. अशा प्रकारचा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी, भारतात विविध पर्यावरण सेवाभावी संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.

धार्मिक धर्मादाय संस्था

भारत हा एक असा देश आहे जिथे धर्मांमध्ये प्रचंड विविधता दिसून येते आणि त्यापैकी जवळजवळ सर्वच धर्म दान आणि लोकांना मदत करण्याच्या संकल्पनेवर प्रकाश टाकतात.

हिंदू धर्मातील ‘दाना’ असो किंवा इस्लाममधील ‘जकात’ असो, दरवर्षी धार्मिक संस्थांना मोठ्या प्रमाणात रक्कम दान केली जाते.

कला आणि संस्कृती धर्मादाय संस्था

भारत आपल्या समृद्ध इतिहास, कला आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो आणि त्यांचे जतन करण्यासाठी देशात अनेक कला आणि सांस्कृतिक सेवाभावी संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय धर्मादाय संस्था

आंतरराष्ट्रीय धर्मादाय संस्था म्हणजे अशा स्वयंसेवी संस्था आहेत, ज्या एका देशात स्थापन झालेल्या असूनही इतर देशांच्या कल्याणासाठी काम करतात.

एखाद्या धर्मादाय संस्थेने केवळ एकाच प्रकारच्या सेवाकार्यासाठी काम करणे आवश्यक नाही, कारण त्यांचा धर्मादाय उद्देश विविध प्रकारच्या सेवाकार्यांशी निगडित असू शकतो.

उदाहरणार्थ, नारायण सेवा संस्थान ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थांपैकी एक आहे, जी केवळ दिव्यांग आणि पोलिओ रुग्णांवर उपचारच करत नाही, तर वंचित आणि विशेष मुलांना दर्जेदार शिक्षणही देते. त्यासोबतच, ते दिव्यांग आणि इतर वंचित लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याचे कामही करतात. संस्थेबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी , तुम्ही येथे वेबसाइटला भेट देऊ शकता !

X
Amount = INR