29 December 2025

अंगारकी चतुर्थीचे व्रत आणि महात्म्य

Start Chat

गणेश उपासनेत चतुर्थी तिथीला खूप महत्व आहे आणि हीच चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अनन्य साधारण असे महत्व येते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका चतुर्थी असे म्हटले जाते. मंगल ग्रहाशी संबंधित त्या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्यलाभ त्याचबरोबर कार्यसिद्धीस हितकारक असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. या दिवशी भक्त श्री गणेशासाठी व्रत (उपवास) करतात. हा दिवस अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणूनही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात गणेशभक्तांकडून हा उपवास विशेष श्रद्धेने पाळला जातो आणि गणेश मंदिरांमध्ये या दिवशी विशेष पूजा-अर्चा केली जाते.


अंगारकी चतुर्थीचे महत्त्व

 अंगारकी चतुर्थीचे महत्त्व गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यांसारख्या वैदिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो. या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात. बुद्धी, विवेक आणि समृद्धीचे अधिपती असलेल्या श्री गणेशाची या दिवशी विशेष पूजा करून सुख-समृद्धीचे आशीर्वाद मागितले जातात.


कधी कोणत्या दिवशी अंगारकी चतुर्थी

साधारणपणे सहा महिन्यातून एकदा चतुर्थी येते पण २०२६ ह्या वर्षात ग्रह-नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे तीन वेळा हा योग येत आहे. यावर्षी ६ जानेवारी, ५ मे आणि २९ सप्टेंबर ह्या तीन दिवशी अंगारकी चतुर्थी येणार आहे. 


अंगारकी चतुर्थीमागील पौराणिक कथा

 गणेश पुराणातील उपासना खंडानुसार, पृथ्वी देवीने  ऋषी भारद्वाज यांचा पुत्र ज्याचे नाव होते ‘मंगळ’ याला सातव्या वर्षापर्यंत वाढवले आणि नंतर त्याला पित्याकडे परत दिले. पित्याकडून त्याने वेद-पुराणांचे ज्ञान प्राप्त केले. मंगळाला भगवान श्री गणेशाविषयी अपार भक्ती होती. गणेशाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्याने तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. ऋषी भारद्वाजांनी त्याला गणपती मंत्र दिला आणि गणेशाची उपासना करण्यास सांगितले.मंगळाने अनेक वर्षे मनोभावे तप केले. माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी (जानेवारी–फेब्रुवारी दरम्यान) भगवान गणेशांनी त्याला आपले विराट रूप दाखवून दर्शन दिले. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशांनी वर मागण्यास सांगितले.मंगळ म्हणाला, “हे प्रभु, मला स्वर्गात सर्व देवांसोबत अमृतपान करण्याचे सौभाग्य मिळावे. माझे नाव तिन्ही लोकांत प्रसिद्ध व्हावे. तसेच ज्या दिवशी मला तुमचे दर्शन झाले, म्हणजे माघ कृष्ण चतुर्थी, तो दिवस विशेष मानला जावा आणि त्या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांना त्यांचे इच्छित फळ मिळावे.” भगवान गणेशांनी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. पुढे त्यांनी सांगितले की, तुझे नाव आता अंगारक म्हणून ओळखले जाईल आणि हा दिवस अंगारक किंवा अंगारकी चतुर्थी म्हणून साजरा केला जाईल. या दिवशी व्रत करून गणेशाची उपासना करणाऱ्यांना इच्छापूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होईल.


अंगारकी चतुर्थीचे व्रत आणि विधी

या दिवशी  गणेश भक्त पहाटे लवकर स्नान करून श्री गणेशाची विशेष पूजा करतात. गणरायाला त्याचा आवडता नैवेद्य मोदक अर्पण केला जातो. गणेशाची मूर्ती किंवा चित्र फुलांनी सजवून आरती केली जाते. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत पूर्ण उपवास केला जातो. चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो. या दिवशी चंद्रदेवाचीही पूजा केली जाते. चंदन, तांदूळ आणि फुले अर्पण केली जातात. काही भक्त फळे, दूध किंवा साबुदाणा खिचडी घेऊन अंशतः उपवास करतात. चंद्रोदयापूर्वी ‘गणपती अथर्वशीर्ष’ यासारखे वैदिक स्तोत्र पठण केले जाते. काही ठिकाणी गणेश याग किंवा यज्ञ आयोजित केले जाते.

 

अंगारकी चतुर्थी व्रताचे लाभ

अंगारकी चतुर्थी व्रत पाळल्यास व श्री गणेशाची भक्तीपूर्वक उपासना केल्यास पुढील लाभ मिळतात:

  •   मंगळ दोष (कुंडलीतील मंगळ ग्रहाच्या दोषामुळे येणाऱ्या विवाह अडचणी) दूर होतात
  •   अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास संपूर्ण वर्षातील संकष्टी चतुर्थी व्रतांचे पुण्य प्राप्त होते
  •   सुख, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते
  •   आर्थिक, कौटुंबिक, आरोग्यविषयक अडचणी दूर होतात
  •   जीवनातील सर्व अडथळे दूर होतात व बुद्धी वाढते
  •   मनोकामना पूर्ण होतात
  •   प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते
  •   पापांमधून मुक्ती मिळते

 


निष्कर्ष

मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी संबोधले जाते आणि तिचे पावित्र्य फार मोठे आहे. मंगळदोष असलेल्यांनी ह्या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्यलाभ त्याचबरोबर कार्यसिद्धीस गुणकारी  मनाली जाते. अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी महागणपतीची  उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात.

नारायण सेवा संस्थान मागील ४ दशकांपासून दिव्यांगांवर शस्रक्रिया करून किंवा कृत्रिम अवयव बसवून त्यांना त्यांच्या पायावर उभे करत आहे. उपचारांबरोबर रुग्णाला संतुलित व पौष्टिक आहार देण्याचे कार्य नारायण सेवा संस्थान करत आहे. ह्या सेवाकार्याला अनेक दानशूर लोकांची साथ लाभत आहे. हिंदू धर्मात दान (दानधर्म) करणे हे अत्यंत पुण्यकारक व श्रेष्ठ कर्म मानले जाते. दान म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे, तर निस्वार्थ भावनेने इतरांच्या कल्याणासाठी दिलेले योगदान होय. दान केल्याने माणसाच्या जीवनात सकारात्मकता, समाधान आणि आध्यात्मिक उन्नती येते. नारायण सेवा संस्थानाच्या सेवाकार्यात आपणही सहभागी होऊ शकतात. आपण केलेली १५०० रुपयाची छोटीशी देणगी सुद्धा आम्हाला ५० गरजू आणि दिव्यांग व्यक्तींसाठी अन्न पुरवू शकते. देणगी देण्यासाठी इथे क्लिक करा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्रश्न: अंगारकी चतुर्थी म्हणजे काय?
उत्तर: अंगारकी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थीच असून, जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. हा दिवस भगवान श्री गणेशांना समर्पित असतो.

प्रश्न: अंगारकी चतुर्थीला “अंगारकी” असे का म्हणतात?
उत्तर: मंगळवार हा मंगळ ग्रहाचा (अंगारक) वार असल्यामुळे या दिवशी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे नाव पडले आहे.

प्रश्न: अंगारकी चतुर्थीचे महत्त्व काय आहे?
उत्तर: अंगारकी चतुर्थी ही वर्षातील सर्वांत प्रभावी संकष्टी चतुर्थी मानली जाते. या दिवशी केलेली गणेशपूजा विघ्ननाश, संकटमुक्ती आणि मनोकामना पूर्णतेसाठी अत्यंत फलदायी मानली जाते.

प्रश्न: या वर्षात अंगारकी चतुर्थी कधी येणार आहे?
उत्तर: साधारणतः अंगारकी चतुर्थी वर्षातून एकदा, क्वचित दोनदा येते. मात्र यावर्षी ती तीन वेळा साजरी केली जाईल—६ जानेवारी, ५ मे आणि २९ सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थी येणार आहे.

प्रश्न: अंगारकी चतुर्थीचा उपवास कसा करतात?
उत्तर: या दिवशी भक्त सकाळी स्नान करून गणेशपूजा करतात. दिवसभर निर्जल किंवा फलाहार उपवास ठेवतात आणि रात्री चंद्रोदय झाल्यावर गणेशपूजा करून उपवास सोडतात.

प्रश्न: अंगारकी चतुर्थीला कोणता नैवेद्य दाखविला जातो?
उत्तर: भगवान गणेशांना मोदक, लाडू, दूर्वा, नारळ आणि गूळ अर्पण केला जातो. मोदक हा गणपतींचा अत्यंत आवडता नैवेद्य मानला जातो.

प्रश्न: अंगारकी चतुर्थीला कोणते मंत्र जप करावेत?
उत्तर: या दिवशी खालील मंत्रांचा जप लाभदायक मानला जातो:
       “ॐ गं गणपतये नमः”
       “वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ”

प्रश्न: अंगारकी चतुर्थी कोणासाठी विशेष लाभदायक आहे?
उत्तर: ही चतुर्थी मंगळदोष असणारे, नोकरी-व्यवसाय किंवा विवाहातील अडचणी अनुभवणारे तसेच कर्ज, आजार किंवा मानसिक तणावात असणाऱ्यांसाठी विशेष फलदायी मानली जाते.

प्रश्न: अंगारकी चतुर्थीला काय करू नये?
उत्तर: या दिवशी असत्य बोलणे, राग, वादविवाद, मांसाहार आणि मद्यपान टाळावे, असे धार्मिकदृष्ट्या सांगितले जाते.

X
Amount = INR