हिंदू संस्कृतीत सण-उत्सवांना विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते. हा दिवस आध्यात्मिक जागृती, आत्मशुद्धी आणि शिवकृपा प्राप्तीचा मानला जातो. शिवपुराणानुसार, याच दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंग (शिवलिंग) स्वरूपात प्रकट झाले. म्हणूनच महाशिवरात्रीला शिवलिंग पूजेला अत्यंत महत्त्व आहे.
महाशिवरात्रीची तारीख, तिथी, आणि महत्वाचे ४ पूजा प्रहर
हिंदू पंचांगानुसार ह्या वर्षी महाशिवरात्री रविवार १५ फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. महाशिवरात्रीची सुरुवात १५ फेब्रुवारी २०२६ संध्याकाळी ५:०४ वा. तर त्याची समाप्ती १६ फेब्रुवारी २०२६ संध्याकाळी ५:३४ वा. होईल. महाशिवरात्रीचा सर्वात श्रेष्ठ मुहूर्त (निशिता काळ) जो पवित्र व फलदायी मानला जातो तो १६ फेब्रुवारी रात्री १२:०९ ते रात्री १:०१ वा म्हणजे सुमारे ५१ मिनिटांचा आहे. या काळात शिवलिंग अभिषेक, मंत्रजप व ध्यान अत्यंत पुण्यदायी मानले जाते. त्याचबरोबर महाशिवरात्रीचे मुख्यत्वे ४ प्रहर आहेत जे पूजा करण्यासाठी महत्वाचे आहेत ते खालील प्रमाणे
पहिला प्रहर
१५ फेब्रुवारी, संध्याकाळी ६:११ ते रात्री ९:२३
या मध्ये महादेवांना जल व दुग्धाअभिषेक करावा आणि बेलपत्र अर्पण करावे
दुसरा प्रहर
१५–१६ फेब्रुवारी रात्री ९:२३ – १२:३५
यामध्ये दही अभिषेक तसेच महादेवांना चंदन व फळ अर्पण करावे
तिसरा प्रहर
१६ फेब्रुवारी रात्री १२:३५ ते पहाटे ३:४७
यामध्ये महादेवांना तूप अभिषेक करावा आणि महामृत्युंजय / रुद्र जप करावा
चौथा प्रहर
१६ फेब्रुवारी पहाटे ३:४७ ते सकाळी ६:५९
यामध्ये महादेवांना मध किंवा ऊसाच्या रसाचा अभिषेक करावा, शिवआरती करावी व नैवेद्य द्यावा
महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी १६ फेब्रुवारी सकाळी ६:५९ ते दुपारी ३:२४ हि वेळ आहे
महाशिवरात्रीबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकी काही खालील प्रमाणे:
१. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठा, पवित्र स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा (शिवपूजेसाठी पांढरे वस्त्र अत्यंत शुभ मानले जाते). घरातील पूजा स्थळ स्वच्छ करून तेथे शिवलिंग किंवा भगवान शंकरांचे पवित्र चित्र प्रतिष्ठापित करा.
२. संकल्प करून मंत्रजपाची सुरुवात करा
हातात पाणी घेऊन महाशिवरात्रीचे व्रत श्रद्धेने पाळण्याचा आणि भक्तिभावाने पूजा करण्याचा संकल्प करा. त्यानंतर “ॐ नमः शिवाय” किंवा प्रभावशाली महामृत्युंजय मंत्राचा जप करून भगवान शिवांचे आवाहन करा.
३. जलाभिषेक व पंचामृत अभिषेक करा
हा महाशिवरात्री पूजेचा मुख्य भाग आहे. शिवलिंगावर खालील क्रमाने अभिषेक करा —
प्रथम शुद्ध पाणी किंवा गंगाजल, त्यानंतर दूध, दही, तूप, मध व साखर (यालाच पंचामृत म्हणतात). शेवटी उसाचा रसही अर्पण करू शकता.
४. अभिषेक विधीनंतर शिवलिंगावर ताजी व अखंड बेलपत्रे वहावीत, बेलपत्रे भगवान शंकरांना शीतलता प्रदान करतात, अशी श्रद्धा आहे. यानंतर शिवलिंगावर चंदन किंवा कुंकू लावले जाते आणि त्यानंतर दीप प्रज्वलन व धूप अर्पण करावे. भगवान शिवांच्या अर्पण करणाऱ्या इतर पूजासाहित्यामध्ये धतुरा तसेच विभूती (भस्म) यांचा समावेश असतो. विभूती ही पवित्र राख असून ती गायीच्या सुकलेल्या शेणापासून तयार केली जाते.
५. व्रत काळात भक्तांनी सर्व प्रकारच्या अन्नापासून दूर राहावे. कठोर उपवासाच्या स्वरूपात पाणीही ग्रहण केले जात नाही. दिवसा फळे व दूध सेवन करण्याचा सल्ला दिला जातो आणि रात्री कठोर उपवास पाळला जातो.
६. महाशिवरात्रीची संपूर्ण रात्र जागरण करण्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. भक्त भजन-कीर्तन, ध्यानधारणा आणि चार प्रहरांत पूजा करीत रात्र व्यतीत करावी. ही अखंड उपासना महादेवाशी एकरूप होण्याचा, मन शुद्ध करण्याचा पवित्र प्रवास आहे
महाशिवरात्री हा केवळ उपवास व पूजा करण्याचा दिवस नसून, मन व वृत्ती शुद्ध करण्याचा, अहंकार त्यागण्याचा आणि करुणेच्या मार्गावर चालण्याचा पवित्र दिवस आहे. या दिवशी श्रद्धेने केलेली उपासना, उपवास आणि दानधर्म भगवान शंकरांची विशेष कृपा प्राप्त करून देतो. भक्ती, संयम आणि दान यांच्या माध्यमातून जीवनात शांती, सकारात्मकता व आध्यात्मिक उन्नती साधता येते. महाशिवरात्री आपल्याला अंतर्मुख होऊन शिवतत्त्व आत्मसात करण्याची प्रेरणा देते.
नारायण सेवा संस्थान गेल्या चार दशकांपासून करोडो रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना अन्नदान करत आहे. उपचारांबरोबरच पौष्टिक अन्न मिळाले कि रुग्णांना ते ऊर्जा देते आणि त्यामुळे ते लवकर तंदरुस्त होतात. आजपर्यंत आम्ही केलेल्या ह्या निशूल्क सेवेला अनेक लोकांनी सढळ हस्ते मदत केली. आपणही या पवित्र उपक्रमात थोडीशी मदत देऊन सहभागी होऊ शकता. आपल्या योगदानामुळे एका रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना दिवसभराचे अन्न मिळू शकते.
प्रश्न: २०२६ मध्ये महाशिवरात्री कधी आहे?
उत्तर: २०२६ मध्ये महाशिवरात्री रविवार, १५ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल.
प्रश्न: महाशिवरात्री २०२६ रोजी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे?
उत्तर: १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२:०९ ते ०१:०१ हा निशिता काळ मानला जातो. हा पवित्र ५१ मिनिटांचा कालावधी भगवान शिवाची पूजा आणि ध्यान करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
प्रश्न: महाशिवरात्रीची पूजा मी घरी करू शकतो का की मंदिरात जाऊन करावी लागते?
उत्तर: तुम्ही घरच्या घरीही महाशिवरात्रीची पूजा करू शकता. देवघर किंवा घरातील देव्हारा स्वच्छ करून शिवपिंड किंवा भगवान शिवाचे चित्र ठेवा आणि भक्तिभावाने विधी पाळा.
प्रश्न: महाशिवरात्रीच्या पूजेच्या वेळी काळे कपडे घालू शकतो का?
उत्तर: नाही, महाशिवरात्रीला काळे कपडे टाळावेत. पांढरे कपडे सर्वोत्तम मानले जातात. नसतील तर हलके रंग जसे क्रीम, पिवळा किंवा केशरी देखील चालतात.
प्रश्न: जर निशिता काळ चुकला तर काय करावे?
उत्तर: निशिता काळ चुकला तरी काळजी करू नका. तुम्ही चार प्रहरांपैकी कोणत्याही वेळी पूजा करू शकता. महाशिवरात्रीची संपूर्ण रात्र आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाची आहे आणि रात्रीच्या कोणत्याही वेळी भक्तिभावाने पूजा केल्यास महादेवांची कृपा लाभते.
प्रश्न: महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास कधी सोडावा?
उत्तर: शक्यतो दिवसा उपवास सोडू नये. उपवास सोडण्यासाठी उत्तम वेळ १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६:५९ ते दुपारी ३:२४ दरम्यान आहे. आरोग्याच्या कारणास्तव उपवास पाळता येत नसेल तर पुरोहितांचा सल्ला घ्यावा.
प्रश्न: बेलपत्र उपलब्ध नसल्यास महादेवांना काय अर्पण करावे?
उत्तर: बेलपत्र नसल्यास तुळशीची पाने, आंब्याची पाने किंवा फुले (शक्यतो पांढऱ्या रंगाची) अर्पण करू शकता.
प्रश्न: महाशिवरात्रीला संपूर्ण रात्र जागरण करणे आवश्यक आहे का?
उत्तर: रात्रभर जागरण केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ मिळतो. मात्र आरोग्याच्या कारणास्तव शक्य नसेल, तर ज्या प्रहरात शक्य होईल त्या वेळी पूजा करा. भगवान शिव नियमांपेक्षा भक्तीला अधिक महत्त्व देतात.
प्रश्न: महाशिवरात्रीच्या प्रत्येक प्रहरात कोणते मंत्र जपू शकतो?
उत्तर: सर्व चार प्रहरांत “ॐ नमः शिवाय” हा मंत्र जपता येतो. तसेच महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्र मंत्र जपल्यास अधिक आध्यात्मिक अनुभव प्राप्त होतो.