आपल्याकडे पितृऋणाची परतफेड ही एक महत्त्वाची जबाबदारी मानली जाते. आपल्या पूर्वजांच्या आठवणींना श्रद्धेने वंदन करण्यासाठी “भाद्रपद अमावास्या” हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. या दिवशी पितृ पूजन, तर्पण, श्राद्ध विधी केल्याने पितरांना शांती मिळते, असे शास्त्रात सांगितले आहे. परंतु आजच्या काळात या परंपरेला सामाजिक जाणिवेची जोड देणेही तितकेच आवश्यक आहे.
पितृऋण फेडून आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो तर त्याच वेळी जर आपण गरजू व्यक्तींना मदत केली तर त्याचे फळ देखील आपल्याला मिळून शकते हे सांगणारा हा ब्लॉग आहे.
पण कसे?
आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी जर आपण अन्नदान, वस्त्रदान, शिक्षण व आरोग्यसेवा यासाठी काही योगदान दिलं, तर त्या दानाचे पुण्य अनेक पटींनी वाढते. म्हणूनच, या पवित्र अमावस्येच्या दिवशी, गरजू, अनाथ व दुर्बल लोकांसाठी काहीतरी केलं तर तेच खरे ‘पितृ पूजन’ ठरेल.
पितृ पूजन हे आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक धार्मिक विधी आहे. हिंदू परंपरेनुसार, जे आपले पूर्वज या जगात नाहीत, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृ पूजन केले जाते. विशेषतः पितृ पक्ष किंवा श्राद्धपक्ष (भाद्रपद पौर्णिमा ते आश्विन अमावास्या) दरम्यान हे पूजन केले जाते.
तर्पण: पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी पाणी, दूध, तीळ आणि कुशा वापरून अर्पण करणे.
श्राद्ध विधी: विशेष अन्न व पिंड अर्पण करून ब्राह्मण भोजन किंवा दान करणे.
दानधर्म: अन्न, वस्त्र, आर्थिक मदत इ. स्वरूपात गरजूंसाठी दान करणे.
हे पूजन म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर आपल्या मुळांचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्यासाठी काही सकारात्मक करण्याचा एक सशक्त माध्यम आहे.
वरील माहिती प्रमाणे पितृ पूजनात दानाला विशेष महत्त्व आहे. हे दान करताना जर आपण सामाजिक विचार केला तर या दानाचे फळ अधिक महत्त्वाचे ठरेल व काही लोकांच्या जीवनात आशेचा किरण जागा होईल.
दान हे केवळ गरजूंसाठी नाही तर ह्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून केले जाते पण हे दान करताना आपण जर योग्य मार्ग निवडला तर त्याचा समाजाला देखील अधिक फायदा होऊ शकतो.
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला आपले योगदान देणे हे आपलं प्रथम कर्तव्य असल्याने ह्या दानाने समाजात असलेल्या गरीब, गरजू आणि वंचित लोकांना ह्याचा फायदा व्हावा याची काळजी घेणं आपलेच कर्तव्य आहे.
नारायण सेवा संस्था गेली अनेक वर्षे गरजू, अपंग, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी आरोग्य, शिक्षण आणि पुनर्वसनाची सेवा करत आहे. या संस्थेद्वारे आपण आपल्या दानाचा योग्य उपयोग करून, कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश पेरू शकतो. विशेषतः भाद्रपद अमावास्यासारख्या पवित्र दिवशी संस्थेला दिले गेलेले दान हे केवळ एक आर्थिक व्यवहार न राहता, श्रद्धेचे आणि संवेदनशीलतेचे प्रतीक ठरते.
नारायण सेवा संस्थेच्या माध्यमातून अन्नदान, अपंगांसाठी मोफत ऑपरेशन, अनाथ मुलांसाठी शिक्षण यासारखे अनेक उपक्रम राबवले जातात. आपण दान करून त्यांच्या जीवनात बदल घडवू शकता – आणि हेच दान पितरांना अर्पण करण्यासारखे पुण्यकारक ठरेल
पितृ पूजन हे केवळ कर्मकांड नसून, आपल्यातील कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा मार्ग आहे. भाद्रपद अमावास्या हा केवळ तर्पण करण्याचा दिवस न राहता, तो दान आणि सेवा यांचेही स्मरण करणारा दिवस ठरू शकतो.
आज जर आपण एक गरजू मुलीचे शिक्षण करून दिले एखाद्या आजारी माणसाला उपचार मिळवून दिले, किंवा भुकेल्या पोटाला अन्न दिलं – तर त्या कृतीतून आपल्या पितरांचं स्मरण अधिक अर्थपूर्ण ठरेल.
प्रश्न: २०२५ मध्ये भाद्रपद अमावस्या कधी आहे?
उत्तर: शनिवार, २३ ऑगस्ट रोजी आहे. अमावस्येची सुरुवात २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११:५५ वाजता होईल आणि समाप्त २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३५ वाजता होईल. या दिवशी पितृ पूजेला विशेष महत्त्व असते.
प्रश्न: पितृ पूजन का केले जाते?
उत्तर: पितृ पूजन पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळवून देण्यासाठी व त्यांचे ऋण फेडण्यासाठी केले जाते.
प्रश्न: दान करणे पितृ पूजनाशी कसे संबंधित आहे?
उत्तर: पितृ पूजनात दान केल्याने केवळ धार्मिक पुण्यच नाही, तर समाजसेवेचा हेतूही साधतो आणि पितरांना संतोष मिळतो.
प्रश्न: गरजूंसाठी कोणत्या प्रकारचे दान करू शकतो?
उत्तर: अन्नदान, वस्त्रदान, आरोग्यसेवा, शिक्षणसामग्री, आर्थिक मदत अशा स्वरूपात दान करता येते.
प्रश्न: नारायण सेवा संस्था काय कार्य करते?
उत्तर: नारायण सेवा संस्था गरजू, अपंग व अनाथांसाठी आरोग्य, शिक्षण व पुनर्वसनाच्या सेवा प्रदान करते.