25 August 2025

गौरी पूजन | पूजेची पद्धत व दानाचे महत्त्व – नारायण सेवा संस्था

Start Chat

भारतीय संस्क्रुती नुसार श्रावण हा महिना खूप महत्वाचा मानला जातो. या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात व पूजा केल्या जातात. 

हा महिना संपल्यावर एक महत्वाचा सण म्हणजे गणपती आणि गौरी. 

या सणाला गौरी गणपती असे नाव असून काही ठिकाणी गौरी, गणपती विसर्जनानंतर येतात तर काही घरांमध्ये गौरी या गणपतीन बरोबर विसर्जित होतात. 

हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र भर साजरा केला जातो तसेच या सणाचे विधी हे प्रत्येक कुटुंबात वेगळ्या कुळाचारा प्रमाणे केले जातात.

गौरींना ज्येष्ठा गौर का म्हणतात?

हा सण भाद्रपद महिन्यात अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मीला आवाहन करून सुरू होतो व ज्येष्ठा नक्षत्रावर या देवीची पूजा करतात. या कारणाने या सणाला ज्येष्ठा गौरी असं ही म्हणलं जातं. या सणाला विविध भागात २ गौरींचे पूजन केले जाते ज्यांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी मानलं जातं. 

या सणाच्या दिवशी, माहेरवाशिणींच्या रूपात आलेल्या गौरी/देवीच स्वागत केले जाते आणि हा सण गणपती प्रमाणे गौरी आगमन ते गौरी विसर्जन पर्यंत साजरा केला जातो. 

गौरी म्हणजे माता पार्वतीचे प्रतीक, या रूपात आलेल्या माता पार्वती चा सण प्रामुख्याने महिलांचा सण मानला जातो व तो पूर्ण महाराष्ट्र भर वेग वेगळ्या काळासाठी साजरा केला जातो.

गौरी पूजनाचे महत्व:

या सणाचे विशेष महत्व म्हणजे असे की गौराईच्या आगमनाने घरात सुख, समाधान, ऐश्वर्य आणि समृध्दीचे येते व नंदू लागते. म्हणून घरी आलेल्या गौरी ला महालक्ष्मी म्हणून तिची पूजा केली जाते.

गौरींच्या मूर्ती

काही घरी व सार्वजनिक मंडळात गौरी ह्या मूर्ती स्वरूपात असतात व त्यांची पूजा आणि विसर्जन खूप मोठ्या प्रमाणात केले जाते. या मूर्तीना छान नटून सजवले जाते व ह्या गौरींचे रूप खूपच लोभस असते. 

अश्या या सणाची पूजा ही प्रत्येक घरात वेग वेगळ्या पद्धतीने केली जाते, पण या पूजेला लागणाऱ्या सामान्य प्रक्रिये बद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. 

चला तर मग जाणून घेऊया गौरी पूजन कसे करावे याचे चरणशः मार्गदर्शन.

१. गौरी पूजनाची तयारी:

गौरी आगमना पासून या सणाच्या तयारीची सुरूवात केली जाते. काही घरांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमना बरोबरच गौरींच्या आगमनाची तयारी केली जाते. ही तयारी करण्याची योग्य पद्धत खाली नमूद केली आहे.

पूजेची जागा निवडा: घरातील स्वच्छ, शांत आणि पवित्र जागी पूजेची व्यवस्था करा. शक्य असल्यास पूजेच्या आधी जागा गंगाजल किंवा पवित्र पाण्याने शुद्ध करा.

गौरींची स्थापना: माती, धातू किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची व्यवस्था करा. काहीजण केवळ सुपारी, हळद-कुंकू किंवा पाटावर ओवाळी करूनही पूजन करतात.

पूजेची सामग्री: फुलं, हार, फळं, नारळ, दुर्वा, कुमकुम, हळद, अक्षता, दीप, अगरबत्ती, नैवेद्य आणि पाण्याचा कलश इत्यादी साहित्य हाताशी ठेवा.

२. गौरी पूजनाची पद्धत प्रत्येक टप्प्याचे मार्गदर्शन 

स्नान व पवित्र वस्त्र परिधान करणे: 

सर्वप्रथम स्वतः स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा.

गौरी आगमनाची तयारी: 

गौरी आवाहन करून गौरी आगमनाला माहेरवाशिणीच्या हाताने गौरींचे मुखवटे घरात आणा. 

ह्या मुखवट्यांना आणताना त्यांचे औक्षण करून, माहेर वाशिणी च्या पायांवर दूध व पाणी अर्पण करून गौरींचे पाय स्वच्छ धुऊन त्यांना आत घ्या. 

त्या नंतर आत आलेल्या गौरीना आपले घर दाखवत व सगळीकडे हस्त स्पर्श करत समृद्धी व भरभराटीची प्रार्थना करा.

गौरींची प्रार्थना: मूर्ती किंवा प्रतीक स्थापन केल्यानंतर देवी गौरीचे ध्यान करा. तिच्या रूपाचे स्मरण करून नमस्कार करा.

कलश पूजन: पाण्याने भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ व अम्रपर्ण ठेवून कलशाचे पूजन करा.

गौराईला स्नान घालणे: थोडेसे दूध, पाणी, पंचामृत याने गौराईला स्नान घालावे. हे प्रतीकात्मक असते.

अलंकार व वस्त्र अर्पण: गौराईला साडी, हार, फुलं अर्पण करा. शक्य असल्यास छोटा सौंदर्यसाज (कुंकू, टिकली, बांगड्या) अर्पण करा.

आरती व नैवेद्य: देवीला नैवेद्य अर्पण करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा. नंतर दीप लावून गौराईची आरती करा.

कथा ऐकणे/वाचन: पूजेनंतर गौरी पूजनाची पारंपरिक कथा ऐका किंवा वाचा.

उद्यापन व विसर्जन: दुसऱ्या दिवशी अथवा मागील परंपरेनुसार गौराईचे विसर्जन केले जाते.

३. दानाचे महत्त्व – पूजनापलीकडे एक पावित्र्य

गौरी पूजन ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून त्यामागे सामाजिक कर्तव्याची जाणीव देखील आहे. देवीला अर्पण केलेली भाकर, गोड पदार्थ किंवा वस्त्र जर गरजूंपर्यंत पोहोचवले तर त्यामागे खरी भक्ती प्रकट होते.

नारायण सेवा संस्था हे अश्या सामाजिक कार्यामध्ये असलेली एक संस्था आहे जी अन्नदान, शिक्षण, आरोग्यसेवा आणि अपंग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी झटते 

गौरी पूजेच्या निमित्ताने आपणसुद्धा एक छोटं पाऊल उचलून गरजूंना अन्न, वस्त्र किंवा आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे आयुष्य थोडंसं उजळवू शकता. 

लक्षात ठेवा देव, धर्म आणि सत्कर्म हे नेहमी चांगलेच असते व त्यासाठी परंपरे बरोबर माणुसकी जपणं हे ही तितकंच महत्वाचं. अशा ह्या पारंपरिक सणाला दानाचा हातभार लाऊन तुम्ही त्याचे पावित्र्य वाढवू शकता. कारण अन्नदान हेच श्रेष्ठ दान.

शेवट:

गौरी पूजन करताना केवळ धार्मिक विधी न करता त्यामागची करुणा, समर्पण आणि सेवा यांना समजून घेणे हेच खरे पूजन ठरते. यंदा पूजनासोबत एक संकल्प करा दानाचा, सेवेचा आणि समाजासाठी काही करण्याचा.

नारायण सेवा संस्था तुमच्या छोट्या दानातून मोठं परिवर्तन घडवू शकते.

गौरीच्या कृपेने आपले घर समृद्ध होवो आणि आपणही कोणाच्या आयुष्यात थोडं सुख आणू हीच इच्छा!

गौरी पूजनाविषयी विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

प्रश्न: गौरी पूजन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
उत्तर: पूजन करताना अस्वच्छता, अपूर्ण साहित्य आणि मनातील नकारात्मक विचार टाळावेत. पूजन भक्तिभाव, स्वच्छता आणि शांततेत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रश्न: गौरी पूजनासाठी कोणती सामग्री आवश्यक असते?
उत्तर: गौरी पूजनासाठी मूर्ती/प्रतिमा, फुले, फळे, हार, साडी, हळद-कुंकू, दीप, नैवेद्य, कलश, नारळ, दुर्वा, पंचामृत इत्यादी साहित्य आवश्यक असते.

प्रश्न: गौरी पूजन घरी करू शकतो का?
उत्तर: होय, गौरी पूजन घरी श्रद्धेने आणि साधेपणाने करता येते. योग्य विधी आणि शुद्ध मनाने केल्यास घरच्या घरी पूजन फलदायी ठरते.

प्रश्न: पूजेनंतर दान का करावे?
उत्तर: गौरी पूजनानंतर गरजूंना अन्न, वस्त्र किंवा आर्थिक सहाय्य दान करणे पुण्यकारक मानले जाते. यामुळे पूजेचे खरे फळ लाभते आणि समाजात सकारात्मक बदल घडतो.

X
Amount = INR