दसरा, ज्याला विजयादशमी असेही म्हटले जाते, हा सण केवळ सोने खरेदी किंवा शस्त्रपूजेपुरता मर्यादित नाही. हा सण आहे आपल्या मनातील अहंकार, राग आणि मत्सराचा पराभव करण्याचा आणि सेवा भाव, विनम्रता व सद्गुणांचा विजय साजरा करण्याचा.
दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला साजरा केला जातो. हा दिवस रामायणातील रामाने रावणाचा पराभव करून सीतेची सुटका केली त्याची आठवण करून देतो. याच दिवशी देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाचा वध करून धर्माची स्थापना केली. त्यामुळे या दिवशी चांगुलपणाचा वाईटावर विजय हा संदेश दिला जातो.
पारंपरिकरीत्या लोक या दिवशी आपल्या शस्त्रांची, साधनांची, वाहने आणि पुस्तके यांची पूजा करतात, ज्याला शस्त्रपूजा म्हणतात. याचा अर्थ आहे की आपल्या रोजच्या कामात वापरल्या जाणाऱ्या साधनांना आपण आदर देतो. महाराष्ट्रात सोने खरेदी करणे, आपट्याची पाने देवाण-घेवाण करणे ही परंपरा आहे, ज्याला “सोने खरेदीचा दिवस” असे म्हटले जाते.
साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी होते.
दसरा आपल्याला शिकवतो की अहंकार, लोभ, राग, मत्सर यांचा अंत करून आपण खऱ्या अर्थाने विजयी होतो. आजच्या काळात सेवा भाव हा सर्वोच्च धर्म आहे. समाजातील गरजूंना मदत करणे, शिक्षण देणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हाच आधुनिक काळातील “रावणाचा वध” आहे.
नारायण सेवा संस्थान दिव्यांग आणि वंचितांसाठी सतत कार्यरत आहे. या मंगल दिवशी आपण त्यांच्या कार्यात सहभागी होऊन समाजात विशेष बदल घडवून आणू शकता आणि या दिवशी अनेक लोकांच्या जीवनात असलेला अंधार दूर करून त्यांना सक्षम बनवून विजयी करू शकता, पण ते कसे?
या विजयादशमीला आपण सर्वांनी एक संकल्प करूया –
आपली छोटीशी मदत कुणाच्या तरी जीवनात मोठा बदल घडवू शकते.
विजयादशमी हा हिंदू परंपरेनुसार अत्यंत पवित्र दिवस आहे, या दिवशी सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाच्या घरात आणि जीवनात परिवर्तन घडवून आणते असे मानले जाते. अश्या या मंगल दिवशी रंजले गांजलेल्याना आधार देणे आणि त्यांच्या आयुष्याला दानाच्या साहाय्याने हातभार लावणे या सारखे पुण्य नाही. तर अश्या या मंगल दिवशी या वर्षी आपणही अहंकार बाजूला ठेवून सेवाभावाचा स्वीकार करूया. नारायण सेवा संस्थानला देणगी देऊन आपण आपल्या आनंदात इतरांना हि सामील करून घेऊया
प्रश्न: दसरा २०२५ कधी आहे?
उत्तर: दसरा (विजयादशमी) २०२५ मध्ये गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.
प्रश्न: दसऱ्याला आपट्याची पाने का देतात?
उत्तर: आपट्याची पाने ‘सोने’ समजून नातेवाईकांना देणे म्हणजे संपत्ती, समृद्धी आणि सौख्याची शुभेच्छा देणे.
प्रश्न: दसरा सणात शस्त्रपूजेचे महत्त्व काय आहे?
उत्तर: शस्त्रपूजेमुळे आपल्या कामाच्या साधनांचा सन्मान केला जातो आणि कार्यात यश मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते.
प्रश्न: दसरा सणाशी रामायणाचा काय संबंध आहे?
उत्तर: या दिवशी श्रीरामाने रावणाचा पराभव करून धर्माच्या विजयाचा संदेश दिला होता, म्हणून याला विजयादशमी म्हणतात.
प्रश्न: दसऱ्याच्या दिवशी देणगी देणे का महत्त्वाचे आहे?
उत्तर: या दिवशी सेवा व दान केल्याने पुण्य लाभते आणि समाजातील वंचितांना मदतीचा हात दिला जातो.