भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला एक विशेष आध्यात्मिक अर्थ असतो. अशाच महत्त्वपूर्ण सणांपैकी एक म्हणजे अनंत चतुर्दशी. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला साजरी केली जाणारी ही तिथी भगवान विष्णूच्या ‘अनंत’ रूपाची पूजा करण्याचा दिवस मानला जातो. या दिवशी लोक सुख, समृद्धी आणि शांतीची कामना करत आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी अनंताची पूजा करतात.
अनंत चतुर्दशीचा इतिहास महाभारतापर्यंत जातो. असे मानले जाते की धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाच्या सल्ल्याने अनंत पूजा केली होती, ज्यामुळे त्याचे सर्व दु:ख दूर झाले. अनंत म्हणजे ‘असिम’, ‘अंतहीन’ जो कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे अनंत चतुर्दशीचा संदेश म्हणजे विश्वास, सातत्य आणि श्रद्धा.
या दिवशी भक्त भगवान विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्या उजव्या हाताला १४ गाठींचा अनंत धागा (कुंकवामध्ये रंगवलेला रेशीम दोरा) बांधतात. या गाठी १४ लोकांचे आणि १४ विद्या/गुणांचे प्रतीक मानले जातात. स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात हा दोरा बांधतात. पूजा झाल्यावर १४ दिवस तो धागा हातात राहतो आणि नंतर पवित्र जलप्रवाहात विसर्जित केला जातो.
अनंत चतुर्दशी ही गणेशोत्सवाची सांगता करणारी तिथी आहे. महाराष्ट्रात लोकमान्य टिळक ह्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू करून दिली आणि त्या नंतर ह्या दिवसाच महत्व अधिक वाढले. ह्या दिवशी फक्त घरच्या नाही तर अनेक मोठ्या मोठ्या मानाच्या गणपतींचे व मंडळाचे विसर्जन केले जाते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी उपासक पवित्र स्नान करून घर स्वच्छ करतात. नंतर पंचामृताने भगवान विष्णूची पूजा केली जाते. तांदूळ, फळे, दूर्वा, कमळ फुले, आणि अनंत सूत्र अर्पण करून विष्णूचा आशीर्वाद मागितला जातो. काही ठिकाणी या दिवशी विशेष “अनंत व्रतकथा” सांगितली जाते आणि घरात प्रसाद वाटला जातो.
गणेश विसर्जनाच्या दिवशीच हा दिवस आल्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये या दोन्ही पूजा एकत्र पार पाडल्या जातात. त्यामुळे भक्तीचा आणि भावनेचा संगम या दिवशी दिसून येतो.
अनंत चतुर्दशी ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर समाजातील सकारात्मक परिवर्तन घडवण्याची संधीही आहे. नारायण सेवा संस्था याच भावनेने प्रेरित होऊन, या दिवशी दान करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
“दान” हे धर्माचे मूलभूत स्तंभ मानले गेले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अन्न, वस्त्र, शिक्षण किंवा आरोग्य सेवेसाठी गरजूंपर्यंत पोहोचवलेले दान, हे केवळ पुण्यकारक नसते तर त्यातून समाजात माणुसकीचा संदेशही दिला जातो.
नारायण सेवा संस्था दिव्यांग, गरजू, शिक्षणहिन आणि आरोग्यसेवांपासून वंचित असलेल्या लोकांसाठी काम करत आहे. अशा पवित्र दिवशी संस्थेला सहकार्य करून आपण आपल्या उपासनेला अधिक फलदायी बनवू शकतो.
तर मग ह्यावर्षी आमच्या संस्थेच्या सहायाने दान करून सत्कर्माने आपल्या उपासनेला मजबूत करा.
प्रश्न: अनंत चतुर्दशी कधी साजरी केली जाते?
उत्तर: अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला, गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी साजरी केली जाते. 2025 मध्ये ही तिथी 5 सप्टेंबर रोजी आहे.
प्रश्न: अनंत चतुर्दशीला कोणाची पूजा केली जाते?
उत्तर: या दिवशी भगवान विष्णूच्या ‘अनंत’ रूपाची पूजा केली जाते. भक्त हातात १४ गाठींचा अनंत धागा बांधून सुख-समृद्धीची कामना करतात.
प्रश्न: अनंत चतुर्दशीच्या दिवशी उपवास ठेवतात का?
उत्तर: होय, अनेक भक्त या दिवशी उपवास करतात. उपवासात फलाहार किंवा केवळ एक वेळ भोजन करून भक्त भगवान विष्णूची पूजा करतात.
प्रश्न: अनंत धागा का बांधतात?
उत्तर: १४ गाठींचा अनंत धागा सुख, समृद्धी, आरोग्य आणि संकटमुक्त जीवनाची कामना करत बांधला जातो. तो धागा अनंताच्या कृपेचे प्रतीक मानला जातो.
प्रश्न: नारायण सेवा संस्थेद्वारे अनंत चतुर्दशीला कशी मदत करता येते?
उत्तर: अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने, आपण नारायण सेवा संस्थेला दान करून दिव्यांग बंधूभगिनींसाठी आरोग्य सेवा, शिक्षण, अन्नदान व पुनर्वसन यामध्ये योगदान देऊ शकतो.