श्रावणाचे शेवटचे दिवस आणि भाद्रपदाच्या सुरुवातीची चाहूल लागली की वातावरणात एक वेगळीच पवित्रता जाणवते. याच काळात आपल्या संस्कृतीतील एक अतिशय महत्वाचा अध्याय सुरु होतो तो म्हणजे श्राद्ध पक्ष. ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक पवित्र मार्ग आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी आपण जे श्रद्धेने अर्पण करतो, त्यालाच ‘श्राद्ध’ म्हणतात.
आपले पूर्वज, ज्यांच्या त्यागामुळे आज आपण इथे आहोत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही योग्य वेळ असते. ब्राह्मण श्राद्ध ही त्यामधली एक पवित्र परंपरा आहे, जी फक्त कर्मकांड नसून भावनांचाही एक गहिरा प्रवाह असतो.
हल्लीच्या काळात जेव्हा सगळे अनेक अडचणींचा सामना करत आहेत ह्या काळात आपल्या पितरांचा आशीर्वाद घेणे हे अधिक महत्त्वाचे झाले आहे. म्हणून ह्या काळात ब्राह्मण श्राद्धचे महत्व देखील अधिक वाढले आहे.
ह्या ब्लॉग मध्ये आपण ब्राह्मण श्राद्ध व दानाचे महत्त्वं जाणून घेणार आहोत.
ब्राह्मण श्राद्ध हा हिंदू धर्मातील एक धार्मिक आणि पारंपरिक विधी आहे, जो पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष दरम्यान केले जाते. या विधीचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या पितरांच्या (पूर्वजांच्या) आत्म्यांना शांती आणि तृप्ती मिळवून देणे.
“श्राद्ध” या संस्कृत शब्दाचा अर्थच आहे, श्रद्धेने केलेला विधी. त्यामध्ये श्रद्धा, कृतज्ञता आणि आपुलकी या भावना असतात.
हिंदू मान्यतेनुसार, आपले पूर्वज मृत्यूनंतर पितृलोकात वास करत असतात. त्यांच्या आत्म्यांना तृप्ती मिळावी आणि ते आपल्यावर सदैव आशीर्वाद ठेवोत, यासाठी त्यांच्या नावाने विशिष्ट विधी केले जातात. यामध्ये ब्राह्मणांना आमंत्रित करून त्यांना:
विधिपूर्वक पूजा केली जाते
पितरांच्या नावाने अन्नदान केले जाते
वस्त्र व दक्षिणा दिली जाते
हे सर्व करताना श्रद्धा हीच मुख्य भावना असते. ब्राह्मण हे या विधीत पितरांचे प्रतिनिधी समजले जातात.
हिंदू धर्मात असा विश्वास आहे की, पितरांच्या आत्म्यांना शांती मिळावी यासाठी विशिष्ट विधी व अन्नदान केले पाहिजे. श्राद्ध विधीत ब्राह्मणांना भोजन व वस्त्र दान करणे, त्यांना श्रद्धेने आमंत्रित करून सन्मानाने सत्कार करणे हे सर्व केवळ औपचारिकता नाही, तर आत्मिक समाधान देणारी प्रक्रिया आहे.
वेदांमध्ये सांगितले आहे की, “यथा अन्नं तथा मनः” म्हणजे जसे अन्न, तसे मन. त्यामुळे ब्राह्मणांना दिलेले अन्न हे पितरांपर्यंत पोहोचते, असे मानले जाते. ब्राह्मण श्राद्धामुळे एकतर आपली जबाबदारी पूर्ण होते आणि दुसरीकडे पूर्वजांप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त होते.
श्राद्धाच्या काळात फक्त आप्तेष्टांनाच नव्हे, तर समाजातील गरजूंनाही अन्न, कपडे, किंवा आर्थिक सहाय्य देणे, हे सुद्धा पितरांचे तर्पण समजले जाते. हेच दान केवळ आध्यात्मिक उन्नतीच देत नाही, तर समाजात समरसतेचा संदेशही पसरवते.
श्राद्धाच्या दिवसांत नारायण सेवा संस्था ही एक विश्वासार्ह संस्था म्हणून गरजूंपर्यंत तुमचे दान पोहोचवते. पितृपक्षात ब्राह्मण भोजन, वस्त्रदान व अन्नदान या माध्यमातून संस्था समाजातील वंचित घटकांना मदत करते.
आपण आपले दान संस्थेमार्फत अर्पण करून दोन गोष्टी साध्य करू शकतो, एक म्हणजे पितरांच्या आत्म्याला शांती लाभते आणि दुसरे म्हणजे गरजूंपर्यंत योग्य मदत पोहोचते. अशा प्रकारे आपले दान एक सामाजिक उत्तरदायित्वही बनते.
शेवट:
पूर्वजांची आठवण फक्त एक दिवसाची नसते, ती मनात घर करून असते. या ब्राह्मण श्राद्ध आणि त्यासोबत केलेले दान ही केवळ एक धार्मिक परंपरा नव्हे, तर आपल्या माणुसकीची खरी ओळख असते.
चला, या पवित्र काळात आपणही एक संकल्प करू पितरांची शांती आणि समाजाची समृद्धी या दोन्ही उद्दिष्टांसाठी आपले योगदान देऊया. नारायण सेवा संस्थेच्या माध्यमातून योग्य ठिकाणी दान करून, या श्राद्धपर्वाला एक नवसंकल्प देऊया!