सनातन धर्मामध्ये, वैशाख पौर्णिमेला अत्यंत पवित्र, पुण्यफल प्राप्त करून देणारा, आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. हा दिवस विशेषत: धर्म, तपस्या, आध्यात्मिक साधना, पवित्र स्नान, दानधर्म आणि परमेश्वराची भक्ती करण्यासाठी शुभ मानला जातो.
धर्मग्रंथांनुसार, पौर्णिमा स्वतःमध्येच अत्यंत शुभ असते, परंतु वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी विशेष अनुकूल मानली जाते. वैशाख हा भगवान विष्णूंचा आवडता महिना आहे अशी मान्यता आहे.
असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णुंची मन:पूर्वक पूजा केल्याने, उपवास ठेवल्याने, मंत्रजप, तपस्या केल्याने, आणि दानधर्म केल्याने अक्षय्य पुण्य प्राप्त होते तसेच समृद्धी, आनंद, आणि मानसिक शांतताही प्राप्त होते. हा दिवस सकारात्मक ऊर्जा, कौटुंबिक कल्याण आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा करून देतो.
वैशाख पौर्णिमा २०२६ कधी आहे?
२०२६ मध्ये, वैशाख पौर्णिमा शुक्रवार, दिनांक १ मे , २०२६ रोजी साजरी केली जाईल.
उदय तिथी (सूर्योदयावर आधारित गणना नुसार, १ मे रोजी स्नान करणे, उपवास ठेवणे, पूजा, आणि दानधर्म करणे हे विधी शुभ मानले जातील.
वैशाख पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व
धर्मग्रंथांमध्ये, वैशाख महिन्याचे तप करण्याचा आणि पुण्य प्राप्त करून घेण्याचा महिना म्हणून वर्णन केले आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला केली गेलेली धार्मिक कार्ये अनेक पटीने परिणाम प्राप्त करून देतात.
भगवान विष्णुंची भक्ती केल्याने, मंत्रजप, दीपदान, आणि दानधर्माची कार्ये केल्याने आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊन आपल्याला दैवी आशीर्वाद प्राप्त होतो.
अशी मान्यता आहे की प्रात:काळी नदी, तलाव, किंवा घरी गंगाजलमिश्रित पाण्याने पवित्र स्नान केल्याने पापांचे क्षालन होण्यास मदत होते. यानंतर, भगवान विष्णूंचे पूजन केल्याने आपल्या घरात शांतता, समृद्धी, आणि सुसंवाद नांदतात.
या पावन दिवशी, चंद्राचा पूर्ण प्रकाश मन आणि आत्मा शुद्ध करतो, त्यामुळे मानसिक संतुलन, अध्यात्मिक जागृती आणि सकारात्मकतेसाठी हा आदर्श वेळ असतो.
वैशाख पौर्णिमा व्रत आणि पूजाविधी
वैशाख पौर्णिमेदिवशी, ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. स्नान केल्यानंतर, स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यादेवाला अर्घ्य द्यावे.
नंतर भगवान विष्णूंचे पूजन प्रारंभ करण्याधी संकल्प करावा.
पूजे दरम्यान, भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळशीपत्रे, धूप, दीप, चंदन, आणि नैवेद्य अर्पण करावा.
या दिवशी “ओम नमो भगवते वासुदेवाय” मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते.
या दिवशीच्या प्रमुख प्रथा
अशी मान्यता आहे की धर्मराजाच्या नावाने जलाने भरलेला कलश, अन्न, आणि तीळ दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते.
वैशाख पौर्णिमेदिवशी दानधर्म करण्याचे महत्त्व
सनातन धर्मामध्ये, दानधर्म सर्वश्रेष्ठ कार्य मानले गेले आहे. विशेषतः कलियुगात, दानधर्माला सर्वोत्तम धर्म मानला गेला आहे.
धर्मग्रंथ सांगतात:
“तपः परम कृतयुगे, त्रेतायाम् ज्ञानम् उच्यते
द्वापरे यज्ञमेवाहू, दानम एकम कलौ युगे.”
अर्थ: सत्ययुगात, तपस्या सर्वोच्च होती; त्रेतायुगात, ज्ञान महत्त्वाचे होते; द्वापारयुगात, यज्ञा (बलिदान )वर भर देण्यात आला; आणि कलियुगात, दानधर्म कल्याणाकडे नेणारा एकमेव मार्ग आहे.
वैशाख पौर्णिमेदिवशी, अन्न, जल, आणि धन दान केल्याने महान पुण्य प्राप्त होते. भूकेलेल्यांना, गरीब, असहाय्य, आणि दिव्यांग जनांना मदत करणे हीच खरी ईश्वरसेवा मानली जाते.
अशी मान्यता आहे की या दिवशी दानधर्म केल्याने पापांचे क्षालन होऊन आनंद, शांतता, आणि समृद्धी प्राप्त होते.
वैशाख पौर्णिमेच्या पावन तिथीला दान करा
या पवित्र तिथीला, भुकेलेल्यांना भोजन देणे, असहाय्य लोकांना आधार देणे, आणि गरजूंना मदत करणे हाच खरा धर्म मानला जातो.
या पावन दिवशी, नारायण सेवा संस्थानाच्या उपेक्षित, असहाय्य, आणि दिव्यांगजन मुलांना अन्नदान करण्याच्या प्रकल्पात आपले योगदान द्या व दैवी आशीर्वाद प्राप्त करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)
प्र. २०२६ मध्ये वैशाख पौर्णिमा कधी आहे?
उ: २०२६ मध्ये वैशाख पौर्णिमा शुक्रवार, दिनांक १ मे, २०२६ रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमा तिथी ३० एप्रिल रोजी रात्री ९:१२ वाजता प्रारंभ होईल आणि १ मे रोजी रात्री १०:५२ वाजता समाप्त होईल.
प्र: वैशाख पौर्णिमेला कोणत्या देवताचे पूजन केले जाते?
उ: या पावन दिवशी भगवान विष्णूंचे पूजन केले जाते. त्यांना तुळशीची पाने, पिवळी फुले, आणि धूपदीप अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
प्र: वैशाख पौर्णिमेदिवशी कोणत्याप्रकारचे दान शुभ आहे?
उ: या दिवशी गरजूंना अन्नदान करणे अत्यंत शुभ आणि पुण्यदायी आहे.