नारायण सेवा संस्थान ही वंचित आणि दिव्यांग लोकांसाठी आशेची किरण आहे. अप्रत्याशित परिस्थितींमुळे आपले अवयव गमावणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची गतिशीलता आणि सन्मान पुनर्स्थापित करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. उपोरोक्त कार्यशाळा आणि प्रोस्थेटिक्स तसेच ऑर्थोटिक्स अभियंत्यांच्या प्रयत्नांद्वारे, आम्ही दिव्यांग बंधू-भगिनींना नि:शुल्क अत्याधुनिक कृत्रिम अवयव प्रदान करतो जे त्यांना पुन्हा त्यांच्या स्वातंत्र्याची प्राप्ती करण्यास सक्षम बनवतात.
देशाच्या इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना मानसिक आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते. यामुळे ते आयुष्यभर सामान्य जीवन जगण्यासाठी संघर्ष करत असतात. महाराष्ट्रात अवयव गमावण्याची मुख्य कारणे म्हणजे मधुमेह, औद्योगिक तसेच रस्ते अपघात यांसारख्या अनेक दुर्दैवी घटना आहेत. यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून, नारायण सेवा संस्थान पुण्यातील गरजूंना नि:शुल्क कृत्रिम अवयव प्रदान करण्यासाठी एक शिबिर आयोजित करत आहे. ज्यामुळे त्यांना केवळ शारीरिक सहाय्यच नाही तर जगण्याची नवीन आशा आणि संधी देखील मिळेल.
नुकतेच 19 मे 2024 रोजी संस्थेतर्फे पुणे, महाराष्ट्र येथे नि:शुल्क “दिव्यांग तपासणी – निवड, नारायण लिंब आणि कॅलिपर मोजमाप शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पुणे आणि आसपासच्या भागातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ज्यामध्ये 293 व्यक्तींची कृत्रिम अवयव वितरणासाठी निवड झाली. त्यानंतर त्यांचे अवयव मोजमाप घेतले गेले.
सर्व निवडलेल्या दिव्यांग भावांना आणि बहिणींना आगामी शिबिरात कृत्रिम अवयव प्रदान केले जातील. या सेवा प्रकल्पाला शक्य करण्यासाठी आमच्या संस्थेला तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. आपण सर्वजण मिळून या गरजू लोकांच्या जीवनात आशेचा प्रकाश आणू शकतो.
तुमचे सहकार्य पुणे आणि आसपासच्या भागात राहणाऱ्या प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात नवीन आशेचा किरण आणू शकतो. तुमच्या सहकार्यामुळे असहाय्य दिव्यांगांना जीवन जगण्याची नवी संधी मिळेल.
कृपया दान करून दिव्यांगांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करा.
तुमचे ५,००० रुपये दान दिव्यांगांना त्यांच्या पायावर चालण्यास मदत करेल.