नारायण सेवा संस्थानतर्फे गरजू आणि दिव्यांग जोडप्यांसाठी मोफत ‘दिव्यांग विवाह सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आजच आपली नोंदणी करा. लग्नाच्या ठिकाणी येण्या-जाण्याचा प्रवास, राहणे आणि जेवणाची संपूर्ण सोय आमच्या संस्थेकडून अगदी मोफत केली जाईल.
कृपया दिव्यांग विवाहाशी संबंधित सर्व नियम लक्षपूर्वक वाचा.
नवरदेवाचे वय कमीत कमी २१ वर्षे आणि नवरीचे वय कमीत कमी १८ वर्षे असणे आवश्यक आहे.
लग्नाआधीच वधू आणि वराची जोडी ठरलेली असणे अनिवार्य आहे.
ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे.
लग्न म्हणजे दोन कुटुंबांचे नाते. त्यामुळे नाते ठरवण्यापूर्वी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांची आवश्यक माहिती स्वतंत्रपणे जाणून घेणे गरजेचे आहे.
दिव्यांग विवाह सोहळ्यात वधू आणि वर दोघेही आपापल्या सोबत जास्तीत जास्त २ पाहुण्यांना आणू शकतात.
लग्नाआधी जोडप्याला एकदा उदयपूरला बोलावले जाईल, आणि या प्रवासाचा सर्व खर्चसुद्धा नारायण सेवा संस्थानच करेल.
लग्नाच्या ठिकाणी येण्या-जाण्याचा प्रवास, राहण्याची उत्तम सोय आणि जेवणाची संपूर्ण व्यवस्था नारायण सेवा संस्थानतर्फे मोफत केली जाईल.
विवाहाशी संबंधित सर्व अंतिम निर्णय घेण्याचा हक्क पूर्णपणे संस्थेच्या कार्यकारिणी समितीकडे असेल.
कागदपत्रे JPG, PNG किंवा PDF फॉरमॅटमध्ये अपलोड करा. प्रत्येक फाईलची साईझ जास्तीत जास्त ८००KB असावी. फोटो १ आणि फोटो २ अपलोड करणे अनिवार्य आहे, बाकी कागदपत्रे तुम्ही नंतरही जमा करू शकता.
खाली दिलेल्या कागदपत्रांचे फोटो किंवा स्कॅन प्रती फॉर्ममध्ये अपलोड करा आणि लग्नाच्या वेळी मूळ कागदपत्रे सोबत नक्की आणा.
उमेदवाराचे दोन फोटो
वयाचा पुरावा (गुणपत्रिका / जन्म दाखला / टीसी - शाळा सोडल्याचा दाखला)
पालकांचे संमतीपत्र (५० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर)
वर/वधूचे संमतीपत्र (५० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर)
अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र (सरपंच/नगरसेवक यांच्या स्वाक्षरीसह लेटरहेडवर)
दिव्यांगत्व प्रमाणपत्र
कृपया सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरा कारण याच माहितीचा वापर नोंदणीसाठी केला जाईल.
नारायण सेवा संस्थान सेवाधाम सेवा नगर, हिरन मगरी, सेक्टर -४, उदयपूर (राजस्थान) - ३१३००१ भारत